-
रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या बहुचर्चित बोल बच्चन चित्रपटाला आठ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अभिनेता अजय देवगणने सोमवारी बोल बच्चन चित्रपटाची आठवण म्हणून एक टि्वट केले. (फोटो सौजन्य – अजय देवगण टि्वटर/प्राची देसाई इन्स्टाग्राम)
-
या टि्वटमध्ये अजयने चित्रपटाच्या सेटवरचे अभिषेक, अमिताभ बच्चन आणि रोहित शेट्टी सोबतचे काही फोटो पोस्ट केले. अजयने त्याच्या टि्वटमध्ये या तिघांना टॅग केले.
-
पण तो चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अन्य कलाकारांना विसरला. यामध्ये प्राची देसाई, कृष्णा अभिषेक , असीन, अर्चना पूरणसिंह, असरानी, नीरज व्होरा, जीतू वर्मा या कलाकारांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
'जेव्हा बच्चन बोलतात तेव्हा मी ऐकतो' (खासकरुन अमितजी) असा फोटोंसह अजयने संदेश लिहिला होता.
-
अजय देवगणच्या या टिवटनंतर प्राची देसाईने टि्वट करुन अजय देवगणला अन्य कलाकारांची आठवण करुन दिली.
-
"अजय देवगण असे वाटते की, तू आम्हाला विसरलास. कृष्णा अभिषेक , असीन, अर्चना पूरणसिंह, असरानी, नीरज व्होरा, जीतू वर्मा हे कलाकार सुद्धा चित्रपट बनवण्यामध्ये सहभागी होते" असे प्राचीने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. एकप्रकार तिने अजय देवगणला टोला लगावला.
-
१९७९ सालच्या गोलमाल या चित्रपटापासून प्रेरित होऊन रोहित शेट्टीने २०१२ साली बोल बच्चन चित्रपट बनवला होता.
-
प्राचीने या चित्रपटात राधिका रघुवंशीची भूमिका साकारली होती. चित्रपटात तिने अजयच्या बहिणीचा व अभिषेक बच्चनच्या प्रेयसीचा रोल केला होता.
-
प्राची देसाईने आधी छोटया पडद्यावर नाव कमावेल. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एकता कपूरच्या 'कसम से' मध्ये तिने बानीची भूमिका साकारली होती.
-
रॉक ऑन, लाईफ पार्टनर, वन्स अपऑन अ टाइम इन मुंबई, बोल बच्चन, अझर यासह बॉलिवूडमधल्या १२ चित्रपटांमध्ये तिने आतापर्यंत काम केले आहे.

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला