करोना विषाणूपासून स्वत:च संरक्षण करण्यासाठी स्वच्छ हात धुणे, चेहऱ्यावर मास्क लावणे या गोष्टी गरजेच्या असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार याविषयीच्या सुचनादेखील देण्यात येत आहेत. यामध्येच कलाविश्वातील काही सेलिब्रिटीदेखील याविषयीची जागृकता निर्माण करण्यासाठी त्याचे मास्क लावलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. मात्र सध्या या सेलिब्रिटींचे नव्या डिझाइन्सच्या मास्कची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे चला पाहुयात सेलिब्रिटींचे काही डिझायनर मास्क. ( सौजन्य : सर्व फोटो सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्राम पेजवरुन) सारा अली खान आणि अमृता सिंग- लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खान आणि अमृता सिंग या मायलेकींचा मास्क लावलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. साराने तिच्या इन्स्टाग्रामवर अमृता सिंगसोबत मास्क लावलेला फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या दोघींनी मॅचिंग मास्क लावले आहेत. टायगर श्रॉफ – अभिनेता टायगर श्रॉफ याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याने टी-शर्टच्या सहाय्याने मास्क तयार केल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच मास्क वापरण्याचा सल्लाही त्याने दिला आहे. प्रियांका चोप्रा- देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक फोटो आणि व्हिडीओ शेअर सोशल मीडियावर शेअर केला होता. यात प्रियांकाने तिच्या कपड्यांना मॅचिंग होईल असा मास्क लावला होता. मनिष रायसिंघानी आणि संगीता चौहान- काही दिवसांपूर्वीच मनिष आणि संगीता हे विवाहबद्ध झाले. त्यांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालन करुन हा लग्नसोहळा मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडला. विशेष म्हणजे या दोघांनीही लग्नाच्या वेळी चेहऱ्यावर मास्क लावले होते. मनीष आणि संगीता हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार आहेत. श्रद्धा कपूर- अभिनेत्री श्रद्धा कपूरने सिद्धांत कपूरसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघंही घरातील सामान खरेदी करताना दिसत असून दोघांनीही चेहऱ्याला मास्क लावला आहे. पूजा बॅनर्जी – 'कसौटी जिंदगी की 2' फेम पूजा बॅनर्जीने फॅशनेबल मास्क लावल्याचं दिसून येत आहे. या फोटोत तिने साडी आणि त्यावर मॅचिंग दिसणारे दागिने आणि मास्क परिधान केले आहेत. करिश्मा तन्ना- अभिनेत्री करिश्मा तन्नादेखील अन्य सेलिब्रिटींप्रमाणेच डिझायनर मास्क लावला आहे. यात तिच्या मास्कवर फुलपाखराची डिझाइन असल्याचं दिसून येतं. या फोटोमध्ये तिने काही पोझ दिल्या आहेत. श्वेता तिवारी- अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या मुलीसोबत फोटो शेअर केला आहे. यात दोघी माय-लेकींनी मास्क लावला आहे. सनी लिओनी- पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने मास्क लावून एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा होत असून काही दिवसापूर्वी तिने घरीच मास्क कसा तयार करावा हे सांगितलं होतं.

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”