-
प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या सरोज खान गेल्या काही काळापासून आजारी होत्या. सरोज खान यांनी जवळपास चार दशकं चित्रपटसृष्टीत काम केलं. त्यांनी दोन हजाराहून अधिक गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं. श्रीदेवी, जुही चावला, माधुरी दीक्षित, करीना कपूर अशा अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत त्यांनी केलं.
-
सरोज खान यांनी फक्त अभिनेत्रीच नाही तर अनेक अभिनेत्यांनाही नृत्याचे धडे दिले. त्यामधील एक अभिनेता म्हणजे गोविंदा.
-
गोविंदा सरोज खान यांच्या डान्स शिकण्यासाठी १९ किमी पायी चालत जात असे. गोविंदानेच एका मुलाखतीत बोलताना ही गोष्ट सांगितली होती.
-
गोविंदाने सांगितलं होतं की, "मला आठवतं तेव्हा मी लहान होतो. डान्स शिकवण्यासाठी मी १९ किमी पायी चालत जात असेल. त्यावेळी माझ्याकडे पैसेही नसायचे. पण डान्सवर असणारं माझं प्रेम मला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असे. माझा हाच निर्धार पाहून सरोज खान यांनी माझ्याकून एक रुपयाही घेतला नव्हता".
-
जेव्हा गोविंदाने सरोज खान यांना आपल्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत असं सांगितलं होतं, तेव्हा सरोज खान यांनीही काही हरकत नाही, जेव्हा येतील तेव्हा दे असं सागितलं होतं.
-
गोविंदा आपल्या डान्सवरील प्रेमासंबंधी बोलताना सांगतो की, "डान्स नेहमी माझं पहिलं प्रेम राहिलं आहे. डान्समुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते".
गोविंदाचं डान्सवरील प्रेम पाहून सरोज खान यांनाही त्याला शिकवण्यात उत्साह येत असे. गोविंदाचं हेच डान्सवरील प्रेम पाहून सरोज यांनी गोविंदाला कोणतेही पैसे न देता ट्रेनिंग दिली होती. -
सरोज खान यांनी गोविंदाला फक्त डान्स शिकवला नाही तर पडद्यावर रोमान्स कसा करायचा हेदेखील सांगितलं.
-
गोविंदाला 'इल्जाम' या पहिल्या चित्रपटात अभिनेत्री नीलमसोबत रोमँण्टिक सीन द्यायचा होता. पण सीन सुरु होताच गोविंदा खूप घाबरत होता. त्यावेळी सरोज खान यांनी गोविंदाला तुझी कोणी प्रेयसी आहे का असं विचारलं होतं. त्यावर गोविंदाने नाही सांगताच सरोज खान यांनी त्याला रोमान्स शिकवला होता.
-
सरोज खान यांच्या निधनानंतर गोविंदाने सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शोक व्यक्त करत पहिल्या भेटीच्या आठवणीला उजाळा दिला आहे.
सरोज खान यांच्यासारख्या शिक्षकांमुळेच माझ्यासारखी सर्वसामान्य व्यक्ती गोविंदपासून गोविंदा होते असं म्हटलं आहे. -
सरोज खान यांना सर्वात पहिली मोठी संधी सुभाष घई यांनी 'हिरो' चित्रपटातून दिली होती. त्यानंतर लोक आपल्याला खऱ्या अर्थाने ओळखू लागले असं सरोज खान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
-
त्यानंतर श्रीदेवीसोबत 'हवा हवाई' आणि माधुरीसोबत 'एक दो तीन' गाणं केल्यानंतर त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर पुन्हा कधी त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
-
सरोज खान यांची सर्वात जास्त जोडी गाजली ती माधुरी दीक्षितसोबत….एक दोन तीन, तम्मा तम्मा, चने के खेत मे अशी एकाहून एक सुपरहिट गाणी दोघींनी एकत्र केली.

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक