-
संगीता बिजलानीने १९८० साली 'मिस इंडिया'चा किताब जिंकला. त्यानंतर तिने मॉडलिंगमध्ये करीयर सुरु केले. तिथून ती अभिनयाकडे वळली. संगीता बिजलानी एका सुशिक्षित सिंधी कुटुंबातून आली आहे. काल तिने वयाच्या ५५ व्या वर्षात पदार्पण केले. पण तिचे फोटो काहीतरी वेगळेच सांगतात. ( फोटो सौजन्य – संगीता बिजलानी इन्स्टाग्राम)
-
संगीता बिजलानीने 'कातिल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी ओळख 'त्रिदेव' चित्रपटातून मिळाली.
-
९० च्या दशकात संगीता बिजलानी सलमान खान सोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत होती.
-
संगीता आणि सलमानचे प्रेम प्रकरण लग्नापर्यंत जाऊन पोहोचले होते. संगीता बिजलानी आणि सलमान खान लग्न करणार अशी १९९४ साली चर्चा होती. पण अचानक हे लग्न रद्द झाले. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.
-
त्यानंतर संगीता बिजलानीचे नाव भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनसोबत जोडले गेले. दोघांच्या अफेअरची त्यावेळी मीडियामध्ये बरीच चर्चा झाली.
-
अझरने त्याची पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला. त्यानंतर १९९८ साली अझर आणि संगीता बिजलानीने लग्न केले.
-
दुर्देवाने अझर आणि संगीता बिजलानीच्या वैवाहिक आयुष्यात अनेक वाद निर्माण झाले. त्याबद्दल मीडियामध्ये बरीच चर्चाही झाली. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.
-
अखेर २०१० साली लग्नानंतर १२ वर्षांनी अझर आणि संगीता बिजलानीचा घटस्फोट झाला. त्यावेळी अझरचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु असल्याची चर्चा होती.
-
सलमान खानसोबत संगीताचे लग्न होऊ शकले नाही. पण आजही ती खान कुटुंबाच्या संपर्कात आहे. खान कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ती दिसते. सलमानची बहिण अलवीरा खान अग्निहोत्री बरोबर तिची चांगली मैत्री आहे.
-
घटस्फोटानंतर संगीता पुन्हा खान कुटुंबाच्या संपर्कात आल्यामुळे पुन्हा एकदा तिच्या आणि सलमानच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. पण असे काहीही नाहीय. सलमान आणि तिच्यामध्ये आता फक्त निखळ मैत्रीचे नाते आहे असे संगीताच्या मैत्रिणी सांगतात. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.
-
संगीता बिजलानी ५५ वर्षांची झाली असली तरी ती आजही तिशीचीच वाटते. यामागे कारण आहे ते फिटनेस. संगीता नियमितपणे योगासने आणि ध्यानधारणा करते.
-
छोटया पडद्यावरही संगीता बिजलानीने काम केले आहे. १९९६ साली चांदनी या मालिकेतून तिने छोटया पडद्यावर पदार्पण केले.
-
संगीता बिजलानीने हसना मत या मालिकेची निर्मिती सुद्धा केली होती.
-
पदार्पणापासून आतापर्यंत संगीता बिजलानी हे नाव नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत राहिले आहे.
-
संगीताने आतापर्यंत २० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ