पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती पुन्हा एकदा सेटवर आल्या आहेत. दहशतवादावर आधिरात असलेल्या चित्रपटात काम करत आहेत. करोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे चित्रिकरण बंद होतं. मात्र, देश अनलॉक होतोय. नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. या चित्रपटाचे नाव SOS Kolkata असे आहे. नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. दोघिंनी सेटवरील काही फोटो आपल्या सोशल हँडलवर पोस्ट केले आहेत. नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती रिअल लाइफमध्ये बेस्ट फ्रेंड्स आहेत. आता स्क्रीनही शेअर करणार आहेत. चित्रपटता नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांच्याशिवाय अभिनेता यश दासगुप्ता आहे. नुकताच चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर रिलिज करण्यात आलं होतं. नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती राजकारणात सक्रीय असल्या तरीही फिल्मी जगाचा मोह त्यांना सोडवत नाही. नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांनी एकत्रच राजकारणात प्रवेश केला होता. आणि आता पुन्हा एकदा एकत्रच चित्रपटात कमबॅक करत आहेत. सोस कोलकाता या चित्रपटापूर्वीही दोघिंनी एकत्र काम केलं आहे. Crisscross 2018, Jamai 420 आणि yoddha: the warrior या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…