-
करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. आतापर्यंत देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांचाही सामावेश आहे. या फोटो गॅलरीमध्ये आपण करोनाची लागण झालेले काही कलाकार पाहणार आहोत.
अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. नानावट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अमिताभ यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम) अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चनलाही करोनाची लागण झाली आहे. त्याने देखील ट्विट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम) 'गेम ऑफ थ्रोन्स' या मालिकेमुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत लोकप्रिय झालेली भारतीय अभिनेत्री इंदिरा वर्मा हिला करोना विषाणूची लागण झाली होती. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम) निर्माता करीम मोरानी यांची मुलगी अभिनेत्री जोया मोरानी हिला देखील करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आता ती बरी झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम) कनोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली गायिका कनिका कपूरची. करोनाची लागण झालेली ती पहिली सेलिब्रिटी होती. तिचे तब्बल पाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. उपचारानंतर आता ती बरी होऊन घरी परतली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम) अभिनेत्री जोया मोरानीसोबतच तिची बहिण शाजा मोरानी हिला देखील करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आता ती बरी झाली आहे. तिने नव्या रुग्णांना बरं करण्यासाठी रक्तदान देखील केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम) बंगाली अभिनेत्री कोयल मल्लिक हिला करोनाची लागण झाली होती. कोयलमुळे तिची मुलगी आणि पतीचा देखील करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम) चेन्नई एक्सप्रेसचे निर्माता करिम मोरानी यांना करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आता ते बरे झाले आहेत. त्यांनी नव्या रुग्णांना बरं करण्यासाठी रक्तदान देखील केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम) बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता किरण कुमार यांना देखील करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आता ते पूर्णपणे तंदुरुस्त झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम) 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमधून नावारुपास आलेली अभिनेत्री मोहिना कुमारी सिंह हिला देखील करोनाची लागण झाली होती. तिच्यामुळे तब्बल २२ लोकांना क्वारंटाईमध्ये ठेवण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम) अभिनेता पूरब कोहली आणि त्यांच्या कुटुंबियांना करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आता ते बरे झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम) प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार वाजित खान यांचं निधन झालं. किडनीच्या आजारामुळे त्यांच निधन झालं. त्यांना देखील करोनाची लागण झाली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…