-
तारक मेहता का उल्टा चष्मा ही विनोदी मालिका सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे.
-
या मालिकेतील बबिता हे ग्लॅमरस पात्र कायमच तरूणांच्या चर्चेचा विषय असतो.
-
मुनमुन दत्ता ही बंगाली अभिनेत्री या मालिकेत बबिता ही व्यक्तिरेखा साकारताना दाखवली आहे.
-
करोनामुळे सुमारे चार महिने ठप्प असलेलं जनजीवन आता सुरळित होण्याच्या मार्गावर आहे.
-
अनेक मालिकांचे शूटिंग इतक्या दिवस बंद होतं. मात्र आता लॉकडाउनच्या अटी शिथिल केल्यामुळे मालिकांचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे.
-
'तारक मेहता…' मालिकेचेही शूटिंग नुकतेच सुरू झाले. लोकांच्या मनात घर करून बसलेली पात्र शूटिंगसाठी नव्या जोमाने तयार झाली.
-
'बोल्ड अँड ब्युटिफूल' बबितानेदेखील खूप दिवसांनंतर होणाऱ्या शूटिंगसाठी खास तयारी केली.
-
पिवळ्या रंगाचा वन पीस परिधान करून शूटिंगसाठी सज्ज असल्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले.
-
"क्वारंटाइनमधून बाहेर पडणं आणि कामासाठी तयार होणं, ही भावना खूप मस्त असते", असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
-
करोनानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचेही तिने पोस्टमध्ये हॅशटॅगच्या माध्यमातून सांगितलं.

ऑक्टोबरमध्ये ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशीब बदलणार! संपत्तीत प्रचंड वाढ, अचानक धनलाभ तर कमाई होईल खूप चांगली