
लॉकडाउनदरम्यान अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत या कलाकारांचा साखरपुडा व लग्नसोहळा पार पडला. 
सोनाली कुलकर्णी- मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवशी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. सोनालीने दुबईत कुणाल बेनोडेकरशी साखरपुडा केला. 
शर्मिष्ठा राऊत- 'बिग बॉस मराठी १' फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने तेजस देसाईशी साखरपुडा केला. लॉकडाउनमध्ये इगतपुरी येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तिचा हा साखरपुडा पार पडला. 
सुवेधा देसाई- 'वैजू नंबर १' या मालिकेत भूमिका साकारत असलेली अभिनेत्री सुवेधा देसाई हिने सागर गावकरशी लग्न केलं. १ जून रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला. 
तेजपाल वाघ- 'लागीरं झालं जी' मालिकेतील अभिनेता तेजपाल वाघ याने २ जुलै रोजी किरण घाडगेशी लग्नगाठ बांधली. एप्रिल किंवा मे महिन्यात या दोघांचं लग्न होणार होतं. मात्र लॉकडाउनमुळे त्यांना लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. 
शुभांगी सदावर्ते- 'सावित्रीजोती' मालिकेतील अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने १३ जुलै रोजी लग्नगाठ बांधली. संगीतकार व दिग्दर्शक आनंद ओकशी तिने लग्न केलं. -
अक्षय वाघमारे- अभिनेता अक्षय वाघमारेनं गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता हिच्याशी लग्नगाठ बांधली. मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन ८ मे रोजी हा लग्नसोहळा पार पडला.
-
‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अर्चना निपाणकर हिने लग्नगाठ बांधली. पार्थ रामनाथपूर आणि अर्चना गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
Delhi Red Fort Blast Reddit Post: दिल्ली स्फोटाची शंका ३ तास आधीच १२वीच्या विद्यार्थ्याने व्यक्त केली होती? पोस्टमध्ये म्हणाला होता, “काहीतरी घडतंय का?”