-
करोनामुळे चित्रपटगृह बंद असल्याने अनेक निर्मात्यांना ओटीटीला पसंती दिली असून थेट ऑनलाइन चित्रपट प्रदर्शित केले जात आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटापासून सुरु झालेला हा ट्रेंड आता चांगलाच जोर धरु लागला आहे. एकीकडे अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टारकडे नव्या चित्रपटांची लांबलचक यादी असताना नेटफ्लिक्स मात्र या स्पर्धेत मागे होतं. पण आता नेटफ्लिक्सही स्पर्धेत उतरलं असून एकूण १० चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. हे कोणते चित्रपट आहेत जाणून घ्या.
-
लुडो – अनुराग बासू यांच्या या मल्टिस्टारर चित्रपटात अभिषेक बच्चन, राजकुमार राव
-
गुंजन सक्सेना – हा चित्रपट एअरफोर्समधील पहिल्या महिला वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित असून जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. गुंजन सक्सेना यांनी कारगिल युद्धात द्रास आणि कारगिलमध्ये चिता हेलिकॉप्टर उडवून पाकिस्तानच्या आक्रमणाचा सामना करीत अनेक सैनिकांना सुरक्षित आणले होते.
-
डॉली किट्टी और वोह चमकते सितारे – या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
-
रात अकेली है – राधिका आपटे, नवाजुद्दीन सिद्धीकी आणि श्वेता त्रिपाटी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात दिसणार आहे.
-
इंदू की जवानी – कियारा अडवाणी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
-
तोरबाज – संजय दत्त या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
द गर्ल ऑन द ट्रेन – परिणीती चोप्रा या चित्रपटात दिसणारआहे
-
गिनी वेड्स सनी – विक्रांत मेस्सी आणि यामी गौतम चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत.
-
याशिवाय अनुराग कश्यपचा एक चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.
-
गिनी वेड्स सनी – विक्रांत मेस्सी आणि यामी गौतम चित्रपटात
Bihar Election Result 2025 Live Updates : भाजपाचा ९० टक्के स्ट्राईक रेट, १०१ पैकी ९० जागांवर मुसंडी!