-
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीची मुलगी निशाचा नुकताच तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. आपला पती आणि ३ मुलांसह अमेरिकेत असलेल्या सनी लिओनीने मुलीच्या वाढदिवसानिमीत्त एक छोटेखानी बर्थ-डे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे फोटो सनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – सनी लिओनी फेसबूक अकाऊंट)
-
जुलै २०१७ मध्ये सनी आणि तिचा पती डॅनिअलने लातूरमधील एका अनाथ आश्रमामधून निशाला दत्तक घेतलं होतं. निशा ही सनी आणि डॅनिअलची पहिली मुलगी…यानंतर निशा सनीच्या कुटुंबाचा एक हिस्सा बनली आहे.
-
आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सनीने एक खास फेसबूक पोस्ट केली आहे. ज्या दिवशी मी तुला पाहिलं त्या दिवशी तू माझी मुलगी आहेस ही भावना माझ्या मनात आली असं सनीने म्हटलंय.
-
तू आम्हाला आई-बाबा बनण्याची संधी दिलीस…तुझी काळजी करण्याचा हक्क दिलास. तुझ्यामुळे आम्हाला खरं प्रेम समजलं. यापुढे तुझ्या प्रत्येक क्षणांमध्ये मी सोबत असणार आहे असं सनीने म्हटलंय.
-
निशाच्या आवडीचे सर्व पदार्थ सनी आणि तिचा पती डॅनिअलने केले होते.
-
या पार्टीसाठी सनीने जवळचे मित्र आणि परिवाराला निमंत्रीत केलं होतं.
-
पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास केलेल्या सनी लिओनीने मुलीला दत्तक घेतल्यानंतर तिच्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक झालं होतं.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी