बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कतरिना कैफचा आज वाढदिवस. २००३ मध्ये तिने करिअरला सुरुवात केली आणि गेल्या १७ वर्षांत तिने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. जाणून घेऊयात, तिच्या कोणत्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली? टायगर जिंदा है – सलमान खान व कतरिना कैफला बॉलिवूडमधली सर्वांत लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी समजली जाते. या दोघांनी एकत्र काम केलेल चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. त्यातलाच एक म्हणजे 'टायगर जिंदा है'. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३३९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. धूम ३ – २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात कतरिना व आमिर खाने पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाने २६०.६३ कोटी रुपयांची कमाई केली होती. भारत- २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. १९७.३४ कोटी रुपयांचा गल्ला कतरिना व सलमानच्या या चित्रपटाने जमवला होता. एक था टायगर- कबीर खान दिग्दर्शत हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. कतरिनाच्या करिअरमधील हा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. १८६.१४ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले होते. बँग बँग – 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटातील हृतिक व कतरिनाची जोडी सर्वांनाच खूप आवडली होती. त्यानंतर 'बँग बँग' चित्रपटात हे दोघं एकत्र झळकले. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून जरी संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी बॉक्स ऑफिसवर १४१.०६ कोटी रुपयांचा गल्ला चित्रपटाने जमवला होता.

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त