-
करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. परंतु यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आतापर्यंत त्याने शेकडो मजुरांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्याच्या या कामाची प्रचंड स्तुती होत आहे. लोकांची मदत करत असताना त्याला आलेले विविध अनुभव आता तो पुस्तकाच्या रुपाने देशवासीयांसमोर मांडणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोनू सूद सध्या एक पुस्तक लिहित आहे. मजुरांची मदत करत असताना त्याला आलेले विविध अनुभव तो या पुस्तकातून सांगणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पुस्तकाचं नाव त्याने अद्याप निश्चित केलेलं नाही. परंतु लवकरच तो या पुस्तकाची अधिकृत घोषणा करेल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पेंग्विन रँडम हाऊस इंडिया या पब्लिकेशन कंपनीने या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी स्विकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सोनूने आपल्या पुस्तकावर भाष्य केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तो म्हणाला, "या करोनामय वातावरणात अनेकांनी गमावलं पण मी मात्र लोकांचं प्रेम कमावलं. माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आज यूपी, बिहार, झारखंड, आसाम, उत्तराखंड यांसारख्या अनेक राज्यांमध्ये असल्याची जाणीव होत आहे. लोकांची मदत करत असताना मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. नवे मित्र मिळाले. हे सर्व मला देशवासीयांसोबत शेअर करायचे आहेत. त्यासाठी मी एक पुस्तक लिहित आहे. लवकरच हे पुस्तक तुमच्या भेटीला येईल." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
“शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला असे म्हटले जात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
आता ‘या’ देशातले Gen Z उतरले रस्त्यावर! राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांवर हल्ला