-
आपला आवडता कलाकार एका चित्रपटासाठी किती मानधन घेतो हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटासाठी जवळपास १२० कोटी रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आताचे सुपरस्टार कोट्यावधी रुपये मानधन म्हणून घेतात. पण करिअरच्या सुरुवातीला ९०च्या दशकात ते किती मानधन घ्यायचे हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया..
-
१९९१ साली अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण १९९४मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहरा' चित्रपटातून तो प्रकाश झोतात आला. या चित्रपटाच्या यशानंतर अक्षय ५५ लाख रुपये मानधन घेत होता असे म्हटले जाते. आज अक्षय सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये आहे.
-
१९९२मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सुनिल शेट्टी त्यावेळी एका चित्रपटसाठी ३० ते ५० लाख रुपये मानधन घ्यायचा असे म्हटले जायचे.
-
'फूल और कांटे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे अजय देवगण. त्याने त्यावेळी एका चित्रपटासाठी ७० लाख रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जाते.
-
करिअरच्या सुरुवातीला शाहरुख २५ ते ३० लाख रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दिल तो पागल है आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटानंतर त्याने मानधन वाढवले होते.
-
त्यावेळी सनी देओल एका चित्रपटासाठी ४० ते ७० लाख रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
९०च्या दशकात अमिताभ बच्चन हे अतिशय लोकप्रिय अभिनेते होते. ते एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते. तेव्हा ते सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये होते.

Asia Cup Final: भारत-पाकिस्तान फायनलसाठी कसं आहे समीकरण? पाक संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी काय करावं लागणार? वाचा सविस्तर