-
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस.. तिच्या नावावर विविध प्रकारचे रेकॉर्ड आहेत. आपण आज जाणून घेऊयात तिच्या नावावर नेमके काय रेकॉर्ड आहेत (सर्व फोटो सौजन्य- प्रियांका चोप्रा-इन्स्टाग्राम पेज)
-
Happy वाला बर्थ डे प्रियंका चोप्रा.. तिची ख्याती जगात पसरली आहे.. जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या खास गोष्टी
-
भारतातली पहिली सर्वात कमी वयाची मिस वर्ल्ड प्रियंका चोप्रा झाली
-
प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड झाल्यानंतरचं छायाचित्र
-
प्रियंका चोप्रा ही पहिली मिस वर्ल्ड आहे जिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला
-
व्हॉट्स युअर राशी या सिनेमात १२ भूमिका करणारी प्रियांका चोप्रा ही पहिली अभिनेत्री ठरली
-
इटलीच्या साल्वाटोर फेरागामो संग्रहालयाकडून प्रियांकाला निमंत्रण देण्यात आलं. २०१० मध्ये तिला हे निमंत्रण मिळालं. त्यासाठी तिचे फूट प्रिंटही घेण्यात आले होते.
-
ट्रेलब्लाझर पुरस्कार मिळालेली पहिली भारतीय अभिनेत्री
-
Creative Artists Agency ने जिला साईन केलं अशी प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडची पहिली अभिनेत्री ठरली
-
प्रियंका चोप्रा ही एकमेव अशी अभिनेत्री आहे जिने जुन्या चित्रपटांच्या रिमेकमध्ये काम केलं. डॉन, दोस्ताना, अग्निपथ आणि जंजीर हे सगळे सिनेमा अमिताभ बच्चन यांनी अजरामर केले होते. या सिनेमांचे रिमेक करण्यात आले त्यात प्रियांका चोप्रा होती
-
प्रियंका चोप्रा ही पहिली अशी अभिनेत्री ठरली जिने पहिलावहिला स्पोर्ट्स बायोपिकमध्ये काम केलं. बॉक्सर मेरी कोमची भूमिका तिने अत्यंत उत्तमरित्या साकारली आहे
-
पहिली दक्षिण आशियाई अभिनेत्री जिने अमेरिकेच्या टीव्ही सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली
-
प्रियांकाने क्वाटिंको या सीरिजमध्ये काम केलं आहे तो शो चांगलाच यशस्वीही ठरला
-
Mobi Series ची निर्मिती करणारी प्रियांका चोप्रा ही पहिली अभिनेत्री आहे
-
‘It’s My City’ असं या मोबी सीरिजचं नाव होतं
-
पिपल्स चॉईस अवॉर्ड मिळालेली प्रियांका चोप्रा ही पहिली अभिनेत्री ठरली आहे
-
क्वांटिको या सीरिजसाठी तिला पिपल्स चॉईस अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं आहे
-
बेवॉच या सिनेमातही प्रियांका चोप्रा झळकली आहे
-
संजय लीला भन्साळींच्या रामलीला या सिनेमातील दिलखेचक अदा असलेलं राम चाहे लीला हे तिचं गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे
-
प्रियांका चोप्राचा हॉट अंदाज
-
प्रियांका चोप्राने प्रसिद्ध गायक निक जोनाससोबत लग्न केलंय.. हे दोघेही इन्स्टाग्रामवर चांगलेच अॅक्टिव्ह असतात
-
प्रियांका आणि निक यांचा खास अंदाज
-
प्रियांकाने काम केलेल्या फॅशन या सिनेमाचं खूप कौतुक झालं.. यातलं जलवा हे गाणं चांगलंच गाजलं
-
देसी गर्ल ही तिची इमेज अजूनही तिने जपली आहे
-
प्रियांका चोप्राने संजय लीला भन्साळीच्या बाजीराव मस्तानी सिनेमात काशीबाई हे पात्र साकारलं होतं तिच्या अभिनयाचं चांगलंच कौतुकही झालं
-
व्हेटिलेटर या मराठी सिनेमाची निर्मितीही प्रियांकाने केली या सिनेमासाठी तिने बाबा हे गाणंही गायलं आहे
-
प्रियांका चोप्रा ही एक चांगली गायिकाही आहे
-
प्रियांका चोप्राचा खास अंदाज
-
प्रियांका सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे
-
Happy Birthday प्रियांका चोप्रा

डॉ.श्रीराम नेने रोज सकाळी एक तास करतात हे महत्त्वाचे काम! दिवस सुरू करण्यापूर्वी अनेक लोक विसरतात; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात