-
अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी ९०च्या दशकात बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर त्यांनी जादू केली होती. पण करिअर यशाच्या शिखरावर असताना त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. आता त्या अमेरिकेमध्ये राहतात. त्या राहत असलेले क्लासिक घर तुम्ही पाहिले आहे का? चला पाहूया..
-
मीनाक्षी या पती हरीश मैसूर आणि दोन मुलांसोबत अमेरिकेमध्ये राहतात.
-
त्या अमेरिकेतील डलास शहरात राहतात.
-
मीनाक्षी यांचे तेथे आलिशान घर आहे.
-
स्विमींगपूलदेखील असल्याचे पाहायला मिळते.
-
मीनाक्षी यांनी त्यांच्या किचनमधील फर्निचर काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये केल्याचे दिसत आहे.
-
त्यांनी घरात देखील सफेद रंगाचे फर्निचर केले असल्याचे दिसत आहे.
-
मीनाक्षी भरतनाट्यम, कुचिपुडी, कत्थक आणि ओडिसी या शास्त्रीय नृत्यात पारंतग आहे.
-
त्या टेक्सासमध्ये ‘चिअरिश डान्स स्कुल’ ही संस्था चालवत आहेत.
-
-
मीनाक्षी यांनी १९८१ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ‘इव्हज् वीकली मिस इंडिया’ हा किताब जिंकला होता
-
त्यांनी निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या 'हिरो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
हा सिनेमा तेव्हाचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. या सिनेमामुळे मीनाक्षी या एका रात्रीत स्टार झाल्या होत्या.
-
त्यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत 'दामिनी' चित्रपटात काम केले होते. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना विशेष पसंतीला उतरली होती.
-
मीनाक्षी यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, आणि विनोद खन्ना अशा सुपरस्टार्ससोबत अनेक चित्रपटात काम केले आहे.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल