'टॅलेंट हंट शो'मध्ये भाग घेण्यापासून ते शोची निवेदिका होईपर्यंत अभिनेत्री प्राजक्ता माळीने फार मेहनत घेतली आहे. केवळ टीव्हीवरच नाही तर चित्रपटांद्वारेही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्या करिअरच्या प्रवासावर एक नजर टाकूयात.. प्राजक्ताने २०११ मध्ये 'क्या मस्ती क्या धूम' या रिअॅलिटी शोमधून टीव्हीवरील प्रवासाची सुरुवात केली. बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे या रिअॅलिटी शोच्या परीक्षकपदी होती. प्राजक्ताने या शोचं विजेतेपद पटकावलं होतं. मॉडेलिंग करत असतानाच प्राजक्ताला ललित प्रभाकरसोबत 'जुळून येती रेशिमगाठी' या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेमुळे प्राजक्ता प्रसिद्धीच्या झोतात आली. या मालिकेतील तिची मेघनाची भूमिका अजूनही प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे. प्राजक्ताने २००७ मध्ये 'गांधी माय फादर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने अभिनेता अक्षय खन्नासोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर प्राजक्ता 'खो- खो', 'संघर्ष', 'हंपी', 'पार्टी' यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये झळकली. चित्रपटानंतर प्राजक्ताने तिचा मोर्चा पुन्हा टीव्हीकडे वळवला. 'नकटीच्या लग्नाला यायचं हा' या मालिकेत तिने नुपूरची भूमिका साकारली. मात्र ही मालिका फार वेळ चालली नाही. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो प्राजक्ताच्या करिअरला मोठं वळण देणारा ठरला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राजक्ताने केलं असून तिने काही नाट्यातही भाग घेतला आहे. आयुष्य भरभरून जगणाऱ्या प्राजक्ताला फिरायची फार आवड आहे. याच आवडीमुळे तिला 'मस्त महाराष्ट्र' हा ट्रॅव्हल शो मिळाला. या शोमुळे महाराष्ट्रातल्या विविध भागात तिला फिरायची संधी मिळाली. -
सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ प्राजक्ता माळी

Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल