बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा दिल बेचारा हा चित्रपट आज अखेर प्रदर्शित होणार आहे. दिल बेचारा हा सुशांतचा अखेरचा चित्रपट ठरल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. काइ पो चे या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. कमी कालावधीत सुशांतने त्याच्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे त्याचे असेच काही गाजलेले चित्रपट पाहुयात. काइ पो चे – छोट्या पडद्यावर पवित्र रिश्ता, तर रुपेरी पडद्यावर काइ पो चे या चित्रपटांच्या माध्यमातून सुशांतने त्याच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवलं. काइ पो चे या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या सुशांतचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजला. या चित्रपटाने ४३ कोटी रुपयांची कमाई केल्याचं म्हटलं जातं. शुद्ध देसी रोमान्स – अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि सुशांतची मुख्य भूमिका असलेला चित्रपट म्हणजे शुद्ध देसी रोमान्स. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटातून परिणीती आणि सुशांतची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळाली. चित्रपटातील गाणीही विशेष गाजल्याचं पाहायला मिळालं. जयदीप साहनी यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्माचे असून निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. या चित्रपटाने ४६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. पीके – अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि आमिर खान यांची मुख्य भूमिका असलेला पीके हा चित्रपट डिसेंबर २०१४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात सुशांत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता. या चित्रपटाने तब्बल ३३७ कोटी रुपयांची कमाई केली होती. डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी हा चित्रपट सुशांतच्या करिअरमधील एक महत्त्वाचा चित्रपट ठरल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटात सुशांतने डिटेक्टिव्ह व्योमकेशी यांच्या भूमिकेत झळकला होता. हा चित्रपट एप्रिल २०१५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याने २६ कोटींची कमाई केली आहे. एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी – लोकप्रिय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात सुशांतने धोनीची भूमिका साकारली होती. २०१६ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुशांतच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला आहे. या चित्रपटाने ११९ कोटी रुपयांची कमाई केली होती. राबता – ‘कुछ तो है तुझसे राबता…’ असं म्हणत सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘राबता’ हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून घेतला होता. या चित्रपटातील गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. दिग्दर्शक दिनेश विजनच्या या चित्रपटाने २१ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. केदारनाथ – ७० कोटींची कमाई करणारा हा चित्रपट २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेत्री सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून साराने पहिल्यांदाच कलाविश्वात पदार्पण केलं होतं. सोनचिडिया – १९७५ साली लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवरनंतर चंबळमधील दरोडेखोऱ्याच्या बदललेल्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. यात सुशांत आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकले होते. तर मनोज बाजपेयीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. हा चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. चित्रपटाने केवळ ५ कोटींची कमाई केली. छिछोरे – सुशांत आणि श्रद्धा कपूर यांची कमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळाली होती. ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाने १४७ कोटी रुपयांची कमाई केली होती.

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव