अभिनेत्री मुग्धा गोडसे तिच्यापेक्षा वयाने १४ वर्षे मोठा असलेला अभिनेता राहुल देवला डेट करत आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ मुग्धा गोडसे) राहुल आणि मुग्धा गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. मुग्धा गोडसेने मधुर भांडारकर यांच्या 'फॅशन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मुग्धा आणि राहुलने कधीच त्यांचं रिलेशनशिप लपवलं नाही. सोशल मीडियावर दोघंही एकमेकांसोबत फोटो पोस्ट करतात. वयातील अंतराबाबत राहुलने एका मुलाखतीत म्हटलं, "सुरुवातीला मला या चर्चांचा थोडा त्रास झाला. पण माझ्या आईवडिलांच्या वयातही दहा वर्षांचं अंतर होतं. त्या तुलनेत हेसुद्धा फार काही अंतर नाहीये. माझ्या मते जोपर्यंत तुम्ही एकमेकांसोबत खुश आहात, तोपर्यंत वयाचं अंतर महत्त्वाचं नाही." राहुल देवची पत्नी रीना कॅन्सरग्रस्त होती. २००९ मध्ये रीनाचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. एका मित्राच्या लग्नाच राहुल व मुग्धाची पहिल्यांदा ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर हळूहळू मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. मुग्धा गोडसेने २०१५ मध्ये आपण राहुल देवसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. राहुल देवला मुलगादेखील आहे. त्याला आपल्या नात्याबद्दल कल्पना असल्याचं राहुल देव सांगतो.

बापरे! सीएसएमटी-गोरेगाव ट्रेनच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; किळसवाणा VIDEO पाहून धक्का बसेल