-
‘सा रे ग म प- लिटील चॅम्प्स’ या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी कार्तिकी गायकवाड सध्या चर्चेत आहे. या चर्चेचं कारण ठरलंय ते म्हणजे कार्तिकीचा साखरपुडा. आपल्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारी कार्तिकी आता नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. (सर्व फोटो : कार्तिकी गायकवाड/ इंस्टाग्राम)
-
२६ जुलै रोजी रोनित पिसेसोबत कार्तिकीचा साखरपूडा झाला आहे.
-
साखरपूड्यासाठी कार्तिकीने लाल रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे.
-
ती या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
-
तर रोनितने लाल रंगाचे ब्लेझर, काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.
-
त्या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांनी मित्रपरिवारात हे लग्न ठरवले आहे.
-
रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून तो इंजिनिअर आहे.
-
कार्तिकी ‘सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स’ विजेती ठरली होती.
-
त्यानंतर तिने कलर्स वाहिनीवरील ‘राइझिंग स्टार’ या रिअॅलिटी शो मध्येही सहभाग घेतला होता.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट