अभिनेता होण्यापूर्वी शिक्षण घेत असतानाच सोनूची सोनालीशी पहिली भेट झाली. नागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असताना सोनू सोनालीच्या प्रेमात पडला. त्यावेळी सोनालीसुद्धा नागपूरमध्ये एमबीएचं शिक्षण घेत होती. सोनाली तेलुगू भाषिक असून प्रसारमाध्यमे, इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून लांबच राहणं पसंत करते. २० हून अधिक वर्षांपासून ही जोडी एकत्र असून एकमेकांच्या सुखदु:खात खंबीरपणे पाठिशी उभे राहतात. सोनाली हेच सोनू सूदचं पहिलं प्रेम असल्याचं म्हटलं जातं. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा खंबीर पाठिंबा असतो असं म्हणतात. ही ओळ अभिनेता सोनू सूदसाठीही तंतोतंत लागू होते. -
सोनू सूदला इशांत आणि अयान अशी दोन मुलं आहेत.
पडद्यावर खलनायकी भूमिका साकारणारा सोनू सूद त्याच्या मदतकार्यामुळे खऱ्या आयुष्यात हिरो ठरला आहे. सोनूच्या या मदतकार्यात सोनालीचाही तितकाच मोठा आहे.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…