अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर आणि मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौत बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, कंगना एका चित्रपटासाठी तब्बल ११ कोटी रुपये मानधन घेते. 'मणिकर्णिका', 'पंगा', 'क्वीन' यांसारख्या यशस्वी चित्रपटांमुळे कंगनाकडे जाहिरातींच्याही खूप ऑफर्स आहेत. जाहिरातीच्या एका दिवसाच्या शूटिंगसाठी कंगना १.५ कोटी रुपये मानधन घेते. कंगनाच्या एकूण संपत्तीचा आकडा समोर आला नाही, मात्र फोर्ब्सच्या २०१९च्या यादीनुसार कंगनाने वर्षभरात १७.५ कोटी रुपयांची कमाई केली होती. फोर्ब्सने १०० सेलिब्रिटींच्या यादीत तिला ७०वं स्थान दिलं होतं. मात्र नंतर फोर्ब्सच्या रिपोर्टवर कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिने आक्षेप घेतला होता. कंगना सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. कंगनाकडे मर्सिडीजसह इतरही अनेक आलिशान व महागड्या गाड्या आहेत. 'गँगस्टर' चित्रपटापासून कंगनाने तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 'तनु वेड्स मनु', 'क्वीन', 'लाइफ इन अ मेट्रो', 'मणिकर्णिका' यांसारख्या चित्रपटांमुळे ती चर्चेत आली. -
कंगना रणौतला 'पद्मश्री' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
-
केवळ १५ वर्षांच्या करिअरमध्ये कंगनाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
-
कंगनाचा कपड्यांचा ब्रँडसुद्धा आहे. vero moda असं त्या बँडचं नाव आहे.
-
सर्व छायाचित्र सौजन्य- फेसबुक- कंगना रणौत

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?