-
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज फेटाळून तिला 'न्यायालयीन कोठडी' सुनावली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान NCB ने केलेल्या या कारवाईवर इतर बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच अभिनेत्री चाहत खन्ना हिने देखील नाराजी व्यक्त केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने सोशल मीडियाद्वारे रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला होता. मात्र ट्रोलर्सशी सामना होताच चाहतने या प्रकरणातून आता माघार घेतली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"मी ड्रग्स घेत नाही, कृपया मला या प्रकरणात खेचू नका", अशी विनंती तिने ट्रोलर्सला केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"डियर फॉलोअर्स, मी अंमली पदार्थांचं व्यसन करत नाही. मी कधीही बॉलिवूड ग्रुप्सची सदस्य नव्हते. रियाला होणारा त्रास मला बघवत नव्हता म्हणून मी तिला पाठिंबा दिला होता. तसं पहिलं तर आपण झिया खानच्या केसमध्ये देखील इतकेच सक्रिय असणं अपेक्षित होतं." अशा आशयाचं ट्विट चाहत खन्ना हिने केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अंमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अंमली पदार्थाचे सेवन कधीच केले नाही, असा दावा रियाने याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये केला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र, आपण शोविक, रियाच्या सांगण्यावरून अनेकदा अमली पदार्थ सुशांतच्या घरी आणले होते, असे नोकर दीपेश याने चौकशीदरम्यान सांगितल्याचा दावा ‘एनसीबी’ने न्यायालयासमोर केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अटके नंतर रियाची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यात प्रतिजन चाचणीचाही समावेश होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
‘एनसीबी’ने दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे रियाला दंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले. ‘एनसीबी’ने रियाच्या पोलीस कोठडीसाठी आग्रह न धरल्याने न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक