अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. संग्रहित (फोटो – पीटीआय) अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला आहे. संग्रहित (फोटो – पीटीआय) -
अमली पदार्थाचे सेवन कधीच केले नाही, असा दावा रियाने याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये केला होता. मात्र, आपण शोविक, रियाच्या सांगण्यावरून अनेकदा अमली पदार्थ सुशांतच्या घरी आणले होते, असे नोकर दीपेश याने चौकशीदरम्यान सांगितल्याचा दावा ‘एनसीबी’ने न्यायालयासमोर केला.
-
रियाची १४ दिवसांच्या कोठडीत रवानगी करण्यात आलेली असून कोर्टाने जामीन नाकारला आहे. संग्रहित (फोटो – पीटीआय)
-
रियाची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आलेली असून कोठडीत एकटीला ठेवण्यात आलं आहे.
रियाच्या शेजारच्या कोठडीत शीन बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आहे. संग्रहित (फोटो – पीटीआय) -
(संग्रहित छायाचित्र)
सुशांत सिंह प्रकऱणामुळे रिया चक्रवर्ती चर्चेत असून तिच्यावर सहकारी कैद्यांकडून हल्ला होण्याची भीती असल्यानेच सर्वांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. संग्रहित (फोटो – पीटीआय) दोन पोलीस कॉन्स्टेबल सतत तीन शिफ्टमध्ये रिनावर नजर ठेवत असून कडक पहारा देत आहेत. संग्रहित (फोटो – पीटीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाला झोपण्यासाठी चटई देण्यात आली आहे. बेड किंवा उशीची कोणतीही व्यवस्था नाही. संग्रहित (फोटो – पीटीआय) तसंच जेलमध्ये पंखाही नसून जर न्यायालयाने परवानगी दिली तर टेबल फॅन दिला जाईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. संग्रहित (फोटो – पीटीआय) -
करोनामुळे सध्या कैद्यांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दूध आणि हळद दिलं जात आहे. मुंबईत महिलांसाठी एकमेव कारागृह असणाऱ्या भाखळ्यातील जेलमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. संग्रहित (फोटो – पीटीआय)
-
सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रिया मुख्य आरोपी आहे.
-
आर्थिक गैरव्यवहाराबाबत सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केलेल्या आरोपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) तपास सुरू आहे.
-
रिया आणि अन्य आरोपींनी भ्रमणध्वनीतून काढून टाकलेले व्हॉट्सअॅप संदेश ईडीने प्राप्त केले. त्यातून रिया आणि अन्य आरोपी अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात होते, अशी माहिती पुढे आली. त्यानंतर ‘एनसीबी’ने गुन्हा नोंदवून या प्रकरणी तपास सुरू केला.

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?