-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोच्या १४ व्या सीझनची सुरुवात येत्या ऑक्टोंबर महिन्यात होईल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ऐश्वर्या रायची डुब्लिकेट म्हणून प्रसिद्ध झालेली स्नेहा बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये झळकणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार स्नेहाने यापूर्वी एकदा बिग बॉसच्या ऑफर नाकारली होती परंतु यावेळी मात्र तिने बिग बॉसच्या घरात जाण्यास होकार दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्नेहा सोबतच करण पटेल आणि राहुल वैद्य याने देखील बिग बॉसची ऑफर स्विकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्नेहाने २००५ साली सलमान खानच्या 'लकी-नो टाइम फॉर लव्ह' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ऐश्वर्या रायसारखी दिसत असल्यामुळे त्यावेळी स्नेहाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर तिने आर्यन, काश मेरे होते, क्लिक यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले. परंतु हे चित्रपट फ्लॉप गेल्यामुळे पुढे तिला काम मिळेनासे झाले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर स्नेहाने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळवला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिथे सिम्हा, अॅक्शन 3D, वेनम, नेनू मिकू तेलूसा यांसारख्या काही चित्रपटांमध्ये तिने काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गेल्या काही काळात ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. परंतु बिग बॉसच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बिग बॉसचं १४वं पर्व येत्या ३ ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बिग बॉसचं १४वं पर्व येत्या ३ ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल