-
टीव्हीवर येणारी क्राईम पेट्रोल ही मालिका सर्वांच्याच परिचयाची असेल. गेल्या १७ वर्षांपासून हा शो लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधनाचं काम करत आहे. (सर्व फोटो – फेसबुक, युट्यूब)
-
या शो मधील अनेक कलाकार आता चित्रपटांमध्येही दिसू लागले आहेत.
-
आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे काही कलाकारही या शोमध्ये आहेत. असंच एक नाव आहे ते म्हणजे गीतांजली मिश्रा हिचं.
-
२०१० पासून गीतांजली मिश्रा ही क्राईम पेट्रोल या कार्यक्रमाशी जोडली गेलेली आहे. तिनं यामध्ये निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत.
-
प्रेक्षकांना तिच्या निगेटिव्ह भूमिका कायमच पसंतीस पडताना दिसतात.
-
क्राईम पेट्रोल या मालिकेमुळेच गीतांजली ही प्रामुख्यानं प्रकाशझोतात आली. तिचे सोशल मीडियावरही अनेक चाहते आहेत.
-
गीतांजली ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
-
तसंच फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती आपल्या फॉलोअर्सशी जोडलेली असते.
-
या मालिकेत अभिनय करणाऱ्या अधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी ती एक असल्याचं म्हटलं जातं. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार ती एका एपिसोडसाठी २ ते २.५ लाख रूपये इतकं मानधन घेते.
-
गीतांजलीनं क्राईम पेट्रोल व्यतिरिक्त मायके से बंधी डोर, रणबीर बानो, सोहनी महिवाल, मिट्टी की बन्नो, जय वैष्णो देवी, बालिका वधू अशा अनेक मालिकांमध्ये अभिनय साकारला आहे.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”