-
लॉकडाउनमुळे प्रेक्षकांचा कल सर्वाधिक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळला आहे. विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर चौकटीबाहेरचे विषय हाताळले जात आहेत. तर सत्य घटनांवर आधारित अनेक भारतीय वेब सीरिजचीसुद्धा निर्मिती केली जात आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता पुढे काय पाहावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सत्य घटनांवर आधारित या भारतीय वेब सीरिज एकदा तरी पाहाच.
द वर्डिक्ट : स्टेट व्हर्सेस नानावटी (The Verdict: State vs Nanavati) कुठे पाहता येईल : AltBalaji, ZEE5 १९५९ मध्ये झालेल्या मर्डर केसवर आधारित कथा या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. पत्नी सिल्व्हियाच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यावर नौदल अधिकारी केएम नानावटी हे व्यावसायिक प्रेम अहुजा यांच्यावर बंदुकीच्या तीन गोळ्या झाडतात आणि त्यानंतर पोलिसांकडे जाऊन आपला गुन्हा कबूल करतात. १० एपिसोड्सच्या या सीरिजमध्ये मकरंद देशपांडे, सुमीत व्यास, मानव कौल, सौरभ शुक्ला यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अवरोध : द सीज विदिन (Avrodh: The Siege Within) कुठे पाहता येईल : SonyLIV जम्मू- काश्मीरमधल्या उरी येथील मुख्यालयावर १८ सप्टेंबर २०१६ मध्ये पहाटेच्या सुमारास चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्याची जगभरातून निंदा झाली. भारतानं या हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं. हे उत्तर म्हणजेच ‘सर्जिकल स्ट्राईक’ होय. दहशतवाद्यांनी भारताच्या मुख्यालयावर हल्ला केला ही गोष्ट भारतीयांनाच काय संपूर्ण जगाला माहिती आहे. पण, या हल्ल्यानंतर गप्प न बसता भारतानं या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा कसा सूड घेतला याची शौर्यगाथा ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात मांडण्यात आली. या सीरिजमध्ये दर्शन कुमार, अमित साध, नीरज काबी, मधुरिमा तुली, विक्रम गोखले, पावैल गुलाटी आणि अनिल जॉर्ज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. काफिर (Kaafir) कुठे पाहता येणार : ZEE5 काश्मीरमधील कथेवर आधारित या सीरिजमध्ये दिया मिर्झा आणि मोहित रैना यांच्या मुख्य भूमिका आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील कैनाझ अख्तर या महिलेला अतिरेकी ठरवत भारतातील तुरुंगात डांबलं जातं. तुरुंगातच ती एका मुलीला जन्म देते. आठ वर्षांच्या संघर्षानंतर पत्रकार वेदांत कैनाझला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. या सीरिजची सिनेमॅटोग्राफी अत्यंत सुंदर आहे. दिल्ली क्राइम (Delhi Crime) कुठे पाहता येणार : Netflix २०१६ मध्ये दिल्लीतील निर्भया प्रकरणावर आधारित ही सीरिज आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला होता. संपूर्ण देशभरात मोर्चे, कॅण्डल रॅली, निदर्शने करत लोकांनी आपला संताप व्यक्त केला होता. निर्भया प्रकरणानंतर कायद्यातही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. नेमक्या याच घटनेवर आधारित वेब सीरिज ‘दिल्ली क्राइम’ नेटफ्लिक्सने आणली आहे. या सीरिजचे एकूण सात एपिसोड्स आहेत. यामध्ये शेफाली शाह मुख्य भूमिकेत आहे. अभय (Abhay) कुठे पाहता येणार : ZEE5 नोएडामधील निठारी या छोट्याशा गावात २००६ मध्ये निठारी हत्याकांडावर आधारित ही सीरिज आहे. दुर्मिळातील दुर्मिळ घटना अशा शब्दांत सीबीआयच्या विशेष न्यायालयाने याचं वर्णन केलं होतं. स्पेशल ओपीएस (Special Ops) कुठे पाहता येणार : Disney Plus Hotstar या सीरिजमध्ये के के मेनन, करण ठक्कर, सैय्यामी खेर, दिव्या दत्ता, विनय पाठक, मुझम्मिल इब्राहिम, मेहेर विज, विपुल गुप्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संसदेवरील हल्ला, २६/११ हल्ल्या, काश्मीरमधील दहशतवाद हल्ला अशा विविध घटनांवर ही सीरिज भाष्य करते. नीरज पांडेने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. रंगबाज (Rangbaaz) कुठे पाहता येणार : ZEE5 गँगस्टर प्रकाश शुक्लाच्या आयुष्यावर आधारित या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये साकिब सालीम, आहाना कुम्रा, रवी किशन, तिग्मांशू धुलिया आणि रणवीर शौरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बहिणीची छेड काढणाऱ्याची हत्या करणाऱ्या तरुणापासून ते उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड होईपर्यंतचा त्याचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे. जमतारा (Jamtara) कुठे पाहता येणार : Netflix झारखंडमधील जमतारा शहरात झालेल्या घोटाळ्यावर आधारित ही वेब सीरिज आहे. शाळेतून काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांचा एक गट यामध्ये कार्यरत असतो. नामांकित कंपन्यांमधील कर्मचारी आहोत असं सांगून ते लोकांची आर्थिक फसवणूक करायचे.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”