-
सुपरस्टार अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर परतले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बिग बींनी केबीसीच्या सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंमुळे त्यांना सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
करोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे झालेली टाळेबंदी यामुळे ‘केबीसी’च्या या १२ व्या पर्वाचे काम रखडले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
टाळेबंदीच्या काळात अमिताभ यांनी घरीच के बीसीसाठी नोंदणीचे आवाहन करणाऱ्या प्रोमोचे चित्रण केले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आल्यानंतरही ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कलाकारांना चित्रीकरणात सहभाग घेण्यास निर्बंध घालण्यात आले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र उच्च न्यायालयाने याप्रकरणीचे निर्बंधही रद्द केल्याने आता सगळेच अडथळे दूर होऊन केबीसीच्या सेटवर परतणे अमिताभ यांना शक्य झाले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान बिग बींनी सेटवरील काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या फोटोंमध्ये बिग बींनी आपल्या चेहऱ्यावर फेस शिल्ड लावलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
करोनाचा संसर्ग टाळता यावा यासाठी फेस शिल्डचा सध्या वापर केला जात आहे. मात्र या फेस शिल्डमुळे सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हे काय घातलंय? फेस शिल्ड नुसतं डोळ्यांवर का लावलंय? निळ्या रंगाचं फेस शिल्ड कुठे मिळालं? अशा प्रकारचे प्रश्न विचारुन त्यांना ट्रोल केलं जात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Raja Gosavi : “पितळी भांडी विकून गुजराण, ब्रेड आणि आमटी…” राजा गोसावींच्या मुलीने उलगडली सुपरस्टारची हलाखी