९०च्या दशकातील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीमध्ये रवीना टंडनचे नाव घेतलं झातं. रवीनाने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ४५ वर्ष ओलांडली तरीही रवीनाच्या सौंदर्यात तीळमात्र फरक जाणवत नाही. या वयातही रवीनाचं सौंदर्य आधिकच खुललं आहे. रवीना टंडन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ ती सतत शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून रवीना आपल्या आयुष्यातील खासगी गोष्टी नेहमी शेअर करत असते. रवीनाने १९९१ मध्ये सलमान खानसोबत ‘पथ्थर के फूल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपट सुपरहिट झाला आणि रवीनाही स्टार झाली. यानंतर रवीनाने अक्षय कुमारसोबत १९९४ मध्ये आलेल्या ‘मोहरा’ चित्रपटात काम केलं. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. सोबतच अक्षय कुमार आणि तिची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. रवीनाला अत्यंत थाटामाटात लग्न करण्याची इच्छा होती. २२ फेब्रुवारी २००४ रोजी अनिल थडानी यांच्यासोबत उदयपूर पॅलेसमध्ये रवीनाचा विवाहसोहळा पार पडला. २००५ मध्ये रवीनाच्या मुलीचा जन्म झाला. तर २००८ मध्ये मुलाचा जन्म झाला. लग्नाआधी रवीनानं दोन मुलीला दत्तक घेतलं होतं. रविनानं चार मुलांचा सांभाळ केला. रवीना टंडन लवकरच संजय दत्तसोबत KGF: Chapter 2 मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. प्रेक्षकांनाही चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. -
(सर्व फोटो – रवीनाच्या इन्स्टाग्रामवरुन घेतले आहेत)

“मी प्रत्येक वेळी सावध…”, करिश्मा कपूरने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…