-
दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिच्या या खळबळजनक आरोपांमुळे अनुरागवर सध्या जोरदार टीका होत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान या प्रकरणात आता अभिनेत्री एलनाज़ नोरौजी हिने उडी घेतली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सेक्रेड गेम्स या सुपरहिट वेब सीरिजमुळे नावारुपास आलेल्या एलनाज़ने या प्रकरणात अनुरागला पाठिंबा दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"सिनेउद्योगालाच नाही तर संपूर्ण जगाला आज अनुरागसारख्या लोकांची गरज आहे", असं म्हणत तिने स्तुती केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एलनाजने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन अनुरागला पाठिंबा दिला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पोस्टमध्ये तिने सेक्रेड गेम्समधील इंटिमेट सीन शूट करताना आलेला अनुभव सांगितला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"सेक्रेड गेम्समधील इंटिमेट सीन शूट करताना मला प्रचंड भीती वाटत होती. माझी मानसिक स्थिती ठिक नव्हती." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"त्यावेळी अनुरागने मला त्याच्या खोलीत बोलावून माझी नेमकी समस्या काय आहे? हे जाणून घेतलं. त्यानंतर माझ्या सोईनुसार त्याने तो संपूर्ण सीन शूट केला." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"अनुराग हा उत्तम दिग्दर्शकच नाही तर खूप चांगला माणूस देखील आहे. आज संपूर्ण जगाला अनुरागसारख्या लोकांची गरज आहे." अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट एलनाजने लिहिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यापूर्वी कल्की कोचलिन, स्वरा भास्कर, आरती बजाज, तापसी पन्नू, राधिका आपटे, अनुभव सिन्हा, सुरवीन चावला यांसारख्या अनेक कलाकारांनी अनुरागला पाठिंबा दिला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पायल घोषचा आरोप काय? – “अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनुरागने फेटाळले आरोप – “क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एलनाज़ नोरौजी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एलनाज़ नोरौजी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा