-
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने २००४ मध्ये अजय देवगणसोबत 'कयामत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (सर्व फोटो – नेहा धुपिया इन्स्टाग्राम)
-
पण अनेकांना माहिती नाही की, नेहा धुपियाने त्याआधी २००० मध्ये एका जपानी चित्रपटात काम केलं होतं.
-
नेहा धुपियाने हिंदीसोबत पंजाबी, तेलुगू, मल्याळम चित्रपटातही काम केलं आहे.
-
फस गये रे ओबामा, जुली, सिंग इज किंग, तुम्हारी सुलू अशा अनेक चित्रपटांमध्ये नेहा धुपिया महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे.
-
नेहा धुपियाने २००२ मध्ये मिस इंडियाचा खिताब जिंकला होता. तसंच मिस युनिव्हर्स स्पर्धेत पहिल्या १० स्पर्धकांमध्ये ती होती.
-
नेहा धुपिया MTV Rodies मध्ये लीडरच्या भूमिकेत दिसते.
-
यानिमित्ताने नेहा अनेकदा आपल्या खासगी आयुष्यातील काही किस्से शेअर करताना दिसते.
-
अशीच आपल्या आयुष्याशी संबंधित एक गोष्ट तिने कार्यक्रमात शेअर केली होती.
-
शोमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या एका मुलीची शरिरयष्टी पाहून नेहा तिच्यावर फिदा झाली होती. आपल्या प्रियकराचं त्याच्या वहिनीसोबत अफेअर असल्याचं आपल्याला कळालं आणि आपल्यासोबत झालेल्या त्या धोक्यामुळेच आपण व्यायाम करण्यास सुरुवात केली आणि ही शरिरयष्टी कमावली असं तरुणीने सांगितलं.
-
यानंतर नेहा धुपियाने आपल्या आयुष्यातही असाच एक प्रसंग घडला असल्याचं पहिल्यांदाच सांगितलं. नेहाने आपण ब्रेक अपला कसं सामोरं गेलं होतो याबद्दल सांगितलं.
-
ब्रेक अपमुळे झालेल्या संताप आणि दुख: यामुळे नेहा धुपिया पहिल्यांदाच १ किमीपर्यंत न थांबता धावली होती.
-
यामुळे नेहाच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि तिने मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. नेहाने २५ किमी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यास सुरुवात केली आणि एकूण सहा मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केल्या. (IE Photo: Deepak Joshi)
-
दरम्यान नेहा सध्या आपल्या संसारात व्यस्त असून लॉकडाउनमध्येही आपल्या चॅट शोच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत असते.
-
नेहा धुपियाने १० मे २०१८ ला अभिनेता अंगद बेदीसोबत लग्न केलं.
-
१८ नोव्हेंबर २०१८ ला नेहाने गोंडस मुलीला जन्म दिला.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”