
दाक्षिणात्य चित्रपटांमधील सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे 'अर्जुन रेड्डी'. या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री शालिनी पांडे मुख्य भूमिकेत झळकले होते. ( सौजन्य : शालिनी पांडे फेसबुक पेज) 
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा याची लोकप्रियता साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटामुळे शालिनी पांडे हे नाव आज घराघरात पोहोचलं. या चित्रपटामुळे शालिनीला अफाट लोकप्रियता मिळाली. 
'अर्जुन रेड्डी' या चित्रपटात शालिनी मुख्य भूमिकेत झळकली होती. तिने प्रिती ही भूमिका साकारली होती. 
या चित्रपटात शालिनीने साकारलेली एका शांत आणि संयमी मुलीची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. 
या चित्रपटानंतर शालिनीच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून बऱ्याचदा तिची चर्चा बॉलिवूडमध्येदेखील रंगल्याचं पाहायला मिळतं. आज शालिनीचा वाढदिवस. त्यामुळे तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊ. 
शालिनीने 'मेरी निम्मो' या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'नादिगयार थिलागम' या तामिळ चित्रपटात मुख्य भूमिका केली. विशेष म्हणजे याच चित्रपटाच्या तेलुगू रिमेकमध्ये म्हणजेच 'अर्जुन रेड्डी'मध्ये देखील ती मुख्य भूमिकेतच झळकली. 
शालिनी अभिनेत्री असण्यासोबतच एक यशस्वी मॉडेलदेखील आहे. तिने आतापर्यंत अनेक नामांकित ब्रॅण्डसाठी काम केलं आहे. 
शालिनी अभिनयसाबोतच सोशल मीडियावरदेखील तितकीच अॅक्टीव्ह असून ती बऱ्याचदा तिचे फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. 
शालिनीला फोटोशूट करण्याचं प्रचंड वेड असल्याचं या फोटोतून दिसून येतं. 
स्वभावाने शांत आणि संयमी असलेल्या शालिनीचं प्राण्यांवर विशेष प्रेम आहे. 
शालिनीने शेअर केलेल्या या फोटमधून तिच्यातील शालिनता दिसून येते. 
कायम साध्या वेशात प्रेक्षकांसमोर येणारी शालिनी वेस्टर्न ड्रेसमध्येदेखील तितकीच ग्लॅमरस दिसते. 
शालिनीच्या एका निखळ हास्यामुळे आज तिचे असंख्य चाहते झाल्याचं दिसून येतं. 
शालिनी तिच्या फिटनेसकडेदेखील तितकंच लक्ष देत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे बऱ्याचवेळा ती तिचा वेळ जीममध्ये घालवत असते. 
या फोटोवरुन शालिनी तिच्याच विचारांमध्ये व्यग्र असल्याचं पाहायला मिळतं. 
अनेकदा शालिनी सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटोदेखील शेअर करत असते. 
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर शालिनी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 
यशराज बॅनर अंतर्गत तयार होणाऱ्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. 
हटके पोझ देताना शालिनी -
शालिनीचा बोल्ड अंदाजातील खास फोटो
मराठी सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं नवीन घर! लग्नाच्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम, पाहा फोटो…