-
टीव्हीवर येणारी क्राईम पेट्रोल ही मालिका सर्वांच्याच परिचयाची असेल. गेल्या १७ वर्षांपासून हा शो लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधनाचं काम करत आहे. (सर्व फोटो – फेसबुक, युट्यूब)
-
या शो मधील अनेक कलाकार आता अन्य मालिका आणि चित्रपटांमध्येही दिसू लागले आहेत.
-
सबिना जट ही अभिनेत्री मुंबईत राहते. सबिनानं क्राईम पेट्रोल या मालिकेत अनेक भूमिका साकारल्या आहेत. याव्यतिरिक्त तिनं कलर्स या वाहिनीवरील एका मालिकेत अभिनय साकारला होता.
-
सारिका ढिल्लोन पंजाब अमृतसरची राहणारी आहे. टीव्हीवरील सर्वात चर्चित नावांपैकी ती एक आहे. तिनं अनेक मालिकांमध्येही अभिनय साकारला आहे. क्राईम पेट्रोलमध्येही तिनं अनेक भूमिका साकारल्या आहेत.
-
२०१० पासून गीतांजली मिश्रा ही क्राईम पेट्रोल या कार्यक्रमाशी जोडली गेलेली आहे. तिनं यामध्ये निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत.
-
प्रेक्षकांना तिच्या निगेटिव्ह भूमिका कायमच पसंतीस पडताना दिसतात.
-
सोनाक्षी मोरे हेदेखील महाराष्ट्रातीलच आहे. मुंबईतून आपलं शिक्षण पूर्ण केलेल्या सोनाक्षीलादेखील क्राईम पेट्रोल मालिकेतून ओळख मिळाली. यानंतर तिनं अन्य काही मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
-
तृष्णा मुखर्जी ही पश्चिम बंगालची राहणारी आहे. तिनं क्राईम पेट्रोल या मालिकेत अनेक भूमिका साकारल्या आहेत.
-
क्राईम पेट्रोल या मालिकेपासून रश्मी गुप्ता ही अधिक प्रकाशझोतात आली. यानंतर तिनं चाहतेदेखील वाढले आहेत.
-
मालिनी सेन गुप्ता हिनं क्राईम पेट्रोल या मालिकेत अनेक भूमिका साकारल्या आहेत. टीव्हीवरील चर्चित नावांपैकी हे एक नाव आहे. पंचलाईट, राधाकृष्ण, बेगुसरासारख्या मालिकांमध्येही तिनं भूमिका साकारल्या आहेत.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल