-
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सीबीआय आणि एनसीबीद्वारा या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान या प्रकरणावर आता एका चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री श्रेया शुक्ला रिया चक्रवर्तीची भूमिका साकारणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२०१७ सालच्या 'मिस इंडिया' या स्पर्धेत श्रेया रनरअप ठरली होती. शिवाय त्याच वर्षी तिने मिस उत्तर प्रदेश ही स्पर्धा जिंकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मॉडलिंगसोबतच श्रेया अभिनय क्षेत्रातही कार्यरत आहे. यापूर्वी तिने काही जाहिरातींमध्ये देखील काम केलंय. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुशांत मृत्यू प्रकरणावर तयार केल्या जाणाऱ्या या आगामी चित्रपटाचं नाव 'सुशांत: न्याय- द जस्टिस' असं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटातून ती आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर एनसीबी अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
राहुल शर्मा आणि सरला सारागोई हे दोघं मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटात अभिनेता जुबेर खान सुशांतची भूमिका साकारणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शिवाय अंकिता लोखंडे आणि सारा अली खान देखील या चित्रपटात झळकतील अशी शक्यता आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'सुशांत: न्याय- द जस्टिस' या चित्रपटाचं दिग्दर्शन दिलीप गुलाटी करणार आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. तसेच न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक