-
मुंबई विरूद्ध बंगळुरू सामन्यात सुपर ओव्हरमध्ये RCBने २ गडी राखून मुंबईवर थरारक विजय मिळवला.
-
बंगळुरूकडून आरॉन फिंच, देवदत्त पडीकल आणि एबी डीव्हिलियर्स या तिघांनी अर्धशतकं ठोकली.
-
या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या इशान किशन आणि कायरन पोलार्डने शतकी भागीदारी करत सामना सुपर ओव्हरपर्यंत खेचला.
-
इशान किशनने तडाखेबाज फलंदाजी करत ५८ चेंडूत ९ षटकारांसह ९९ धावा केल्या. पण सामना बरोबरीत सुटल्यावर सुपर ओव्हरमध्ये मात्र मुंबईचा संघ पराभूत झाला.
-
इशान किशनच्या अथक प्रयत्नानंतरही मुंबईला सामना गमवावा लागल्याने त्याच्यावर सांत्वनाच्या मेसेज आणि ट्विटचा पाऊस पडला. त्यात एक टिप्पणी फारच चर्चेत आली.
-
एका मॉडेल-अभिनेत्रीने इशान किशनला 'बेबी' असं संबोधलं होतं आणि त्याच्या खेळीचा स्क्रीनशॉट इन्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत, 'मला तुझा अभिमान वाटतो', असं लिहिलं होतं.
-
तिच्या या इन्स्टा स्टोरीनंतर, इशान किशनला 'बेबी' म्हणणारी ही अभिनेत्री नक्की कोण? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल.
-
या मॉडेल-अभिनेत्रीचं नाव आहे अदिती हुंडिया.
-
आदिती आणि इशान हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेले वर्षभर सोशल मीडियावर रंगत आहे.
-
आदिती आणि इशानचे काही फोटोदेखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते, पण नंतर ते फोटो त्यांनी डिलीट केले.
-
मुंबई आणि चेन्नई यांच्यातील २०१९च्या IPL FINAL सामन्यामध्येही आदिती मुंबई इंडियन्सला चीअर करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.
-
त्यानंतर इशान आणि आदितीचे काही फोटो सोशल मीडीया व्हायरल झाले होते आणि हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती.
-
आदिती ही मूळची राजस्थानची असून ती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडीओ आणि जाहिरातींमध्ये अभिनय केला आहे.
-
आदिती २०१७च्या मिस इंडिया स्पर्धेतील फायनलिस्ट आहे. २०१८मध्ये तिने 'मिस सुपरनॅचरल इंडिया' हा पुरस्कार जिंकला.
-
नुकतीच ती गायक-संगीतकार अरमान मलिकच्या 'टूटे ख्बाव' या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली. त्यानंतर दोन दिवसांतच इशानसंदर्भातील ट्विटमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. (सर्व फोटो- IPL.com, आदिती हुंडिया इन्स्टाग्राम, सोशल मीडिया)

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’