-
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या युएईमध्ये आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक असणारा झहीर खान याचा आज ४२ वा वाढदिवस. सहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सध्या झहीर आयपीएलबरोबरच समालोचक, क्रिकेट तज्ज्ञ म्हणून काम करतो. झहीरच्या कारकीर्दीप्रमाणेच त्याची लव्ह लाइफही अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत झहीरने २०१७ साली लग्न केलं. या दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. मात्र झहीर हा आपल्या घरच्यांना कशामुळे पसंत पडला याबद्दल सागरिकाने तर घरच्यांना सागरिकाबद्दल कसं पटवलं हे झहीरने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
-
२४ एप्रिल २०१७ रोजी झहीर आणि सागरिकाने सोशल नेटवर्किंगवरुन साखरपुड्याची माहिती दिली. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नबंधनात अडकले. तर २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज महाल पॅलेस अॅण्ड टॉवर येथे त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन पार पडले.
-
सागरिका, क्रिकेटर- अभिनेता अंगद बेदी याची फार जवळची मैत्रीण आहे. अंगदनेच सागरिकाची ओळख झहीरशी करुन दिली होती. दोघांची ओळख २०१५ साली झाली होती.
-
सागरिका आणि झहीर या दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले. मात्र, या दोघांनीही कोणालाच त्यांच्या प्रेमप्रकरणाची कानोकान खबर लागू दिली नाही.
-
युवराज-हेजलच्या विवाह सोहळ्यात झहीर आणि सागरिका एकत्र दिसून आले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले.
-
एप्रिल महिन्यात झहीर- सागरिकाचा साखरपुडा झाला आणि त्यानंतर दोघांनी त्यांचे नाते सर्वांसमोर आले.
-
वेबसाइट्सच्या वृत्तानुसार, पहिल्या भेटीत हे दोघंही एकमेकांना पसंत करू लागले होते. दोघांच्या नंतर भेटीगाठी वाढल्या आणि अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसू लागले. इतकेच नव्हे तर आयपीएल सामन्यांवेळीही सागरिका त्याला पाठिंबा देताना दिसली. (फोटो सौजन्य: instagram/sagarikaghatge वरुन साभार)
-
आपल्या लग्नासाठी घरच्यांची मनधरनी करण्याबद्दल एका मुलाखतीत झहीर म्हणालेला की, मी घरच्यांना सागरिकाबद्दल सांगताच त्यांनी सर्वप्रथम ‘चक दे इंडिया’ ची सीडी मागवली. संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला. सागरिकाच्या आजी इंदौरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या.
-
आम्ही दोघेही मराठी आहोत. मात्र माझं मराठी फारसं चांगलं नाहीय. तर दुसरीकडे झहीर उत्तम मराठी बोलतो. माझ्या घरची मंडळी क्रिकेटबरोबरच सर्व खेळांचे चाहते आहेत, असं सागरिकाने सांगितलं होतं.
-
सागरिकाने एका मुलाखतीमध्ये झहीर मराठी खूप छान बोलत असल्याने त्याने माझ्या कुटुंबावर स्वत:ची वेगळी छाप पाडल्याचे सांगितले होते.
-
क्रिकेटची आवड असण्याबरोबरच झहीर खूप उत्तम मराठी बोलत असल्याने माझ्या घरच्यांना तो फार आवडला असं सागरिकाने सांगितलं होतं.
-
माझ्या आईलाही मराठी बोलता येत नाही मात्र जेव्हा झहीर मराठीत बोलतो तेव्हा तिलाही खूप आनंद होतो, असं सागरिका म्हणाली होती. (फोटो सौजन्य: instagram/sagarikaghatge वरुन साभार)
-
झहीरच्या मराठीच झलक नुकतीच एका व्हिडीओमधून समोर आल्याचेही पहायला मिळालं आहे. मुंबई इंडियन्सचा Director of Cricket Operations झहीरने युएईत सरावादरम्यान दिग्वीजयशी मराठीत बोलून त्याला गोलंदाजीच्या काही टिप्स दिल्या. मुंबई इंडियन्सने काही दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलाय.

Nepal Gen Z Protest : माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळलं! नेपाळमध्ये ‘जेन-झी’ आंदोलकांचा हिंसाचार