-
ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून तपास सुरु असून अनेक सेलिब्रेटींची चौकशी केली जात आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचाही समावेश आहे. (सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
एनसीबीकडून दीपिका, श्रद्धा कपूर, रकुल यांच्यासोबत सारालाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. यानंतर सारा अली खान एनसीबी अधिकाऱ्यांसमोर हजर झाली होती. (Express Photo)
-
सारा अली खान संकटात असताना वडील सैफ मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याऐवजी अंतर ठेवत असल्याचं बोललं जात होतं.
-
ड्रग्ज प्रकरणात साराचं नाव आल्यानंतर सैफ आणि करीन दिल्लीला गेल्याचं वृत्त होतं. (सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
दरम्यान सैफने बॉलिवूड हंगामाशी बोलताना पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
-
सैफने मुलाखतीत सांगितलं आहे की, "मी नेहमीच त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. मी माझ्या तिन्ही मुलांवर सारखंच प्रेम करतो. तैमूरसोबत मी जास्त वेळ घालवतो हे खरं आहे. पण मी नेहमी इब्राहिम आणि साराच्या संपर्कात असते.
-
"माझ्या ह्रदयात प्रत्येकासाठी वेगळी जागा आहे. जर मला साराच्या एखाद्या कृत्यामुळे वाईट वाटत असेल तर तैमूर दिलासा देण्यासाठी काही करु शकत नाही," असंही तो म्हणाला आहे.
-
"मला वाटतं माझी तिन्ही मुलं वेगळ्या वयाची असून प्रत्येकासाठी वेगळ्या कनेक्शनची गरज आहे. फोनवर मी सारासोबत तासनतास गप्पा मारु शकतो किंवा सारा, इब्राहिमससोबत डिनरला जाऊ शकतो, पण हे मी तैमूरसोबत करु शकत नाही," असं त्याने म्हटलं आहे. (सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
साराने सुशांतसोबत केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चौकशीदरम्यान साराने आपण सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होतो असं कबूल केलं आहे.
-
आपण त्याच्यासोबत फार्म हाऊसवर जायचो, पण कधी ड्रग्जचं सेवन केलं नाही असंही तिने म्हटलं आहे. (Express Photo)
-
दरम्यान सैफ अली खानच्या कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. करीना कपूर गर्भवती असून सैफ अली खान चौथ्यांदा वडील तर करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे. (सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
करीना आणि सैफ तैमूरसह सध्या दिल्लीत आहेत. (सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
करीना गर्भवती असतानाही आमीर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. दिल्लीत चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे.
-
अमृता सिंगसोबत सैफचं पहिलं लग्न झालं होतं. पहिल्या लग्नापासून सैफला सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.
-
अमृता सिंगसोबत सैफचं पहिलं लग्न झालं होतं. पहिल्या लग्नापासून सैफला सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत. (सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सैफ करीना आणि तैमूरसोबत मुंबईत फ्लॅटमध्ये राहतो तर सारा आणि इब्राहिम आई अमृता सिंगसोबत राहतात. (सौजन्य – इन्स्टाग्राम)

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ