-
अभिनेत्री ते राजकीय नेत्या असा प्रवास करणाऱ्या खुशबू सुंदर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला आहे.
-
दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. सोमवारी खुशबू यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला होता.
-
तामिळनाडूत काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी ही घडामोड घडली आहे. आठवड्याभरापूर्वी खुशबू सुंदर या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत होत्या. (सर्व फोटो सौजन्य -खुशबू सुंदर इन्स्टाग्राम)
-
प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीशी संबंध नसलेल्या नेत्यांकडून आपला आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न होतोय, असे खुशबू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
-
"पक्षामध्ये वरिष्ठ स्तरावरील काही व्यक्ती, ज्यांचा जमिनीवरील परिस्थितीशी काहीही संबंध नाही, ते निर्णय घेत आहेत. माझ्यासारख्या लोकांना पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करायचे आहे, पण आमचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न होतोय" असे खुशबू सुंदर यांनी पत्रात म्हटले होते.
-
खुशबू सुंदर या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठया स्टार होत्या. त्यांनी २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
१९८५ साली 'मेरी जंग' चित्रपटात खुशबू यांनी 'बोल बेबी बोल, रॉकेन रोल' या गाण्यावर जावेद जाफ्रीसोबत नृत्य केले होते.
-
बॉलिवूडमध्ये १९८५ साली 'जानू' या चित्रपटात त्यांनी जॅकी श्रॉफसोबत मुख्य भूमिका साकारली होती.
-
१९९० साली 'दीवाना मुझसा नही' या चित्रपटात आमिर खान आणि माधुरी दिक्षितसोबतही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
खुशबू सुंदर सहा वर्ष काँग्रेसमध्ये होत्या. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यापूर्वी २०१० साली त्यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला होता. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना भाजपाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”