-
टीव्ही अभिनेत्री अनिता हस्सनंदनीने आपण लवकरच आई होणार असल्याचं जाहीर केलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अनिताने आपल्या आयुष्यातील ही गोड बातमी शेअऱ केली आहे.
-
पण महत्त्वाचं म्हणजे हे जाहीर करण्याच्या आधीपासून अनिता प्रेग्नंट आहे.
-
पण ही बातमी तिने आपल्या चाहत्यांपासून लपवून ठेवली होती.
-
अनिताने इन्स्टाग्रामला फोटो शेअर केले असून कशा पद्धतीने चार वेळा आपण आपला बेबी बंप लपवला हे दाखवलं आहे.
-
अनिताने एकूण चार फोटो शेअर केले असून यामध्ये तिने कपडे अशा पद्दतीने परिधान केले आहेत की ती प्रेग्नंट आहे हे कोणाच्याही लक्षात येणार नाही.
-
"चार वेळा मी बेबी बंप लपवण्यात यशस्वी झाले. थोडक्यात तुम्हा सर्वांना फसवलं," असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
अंकिताच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या असून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अनिताने इन्स्टाग्रामला आपला पती रोहितसोबतच्या प्रवासाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये मित्रापासून ते जोडीदारापर्यंतचा प्रवास तिने दाखवला आहे.
-
अनिता आणि रोहित रेड्डी २०१३ मध्ये विवाहबंधनात अडकले.
-
'नच बलिये ९' मध्ये दोघं सहभागी झाले होते.
-
अनिताने काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
पण टीव्हीवरील भूमिकांमुळेच तिला जास्त प्रसिद्धी मिळाली.
-
'ये है मोहाबत्ते', 'कभी सौतन कभी सहेली', 'काव्यांजली' अशा अनेक मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या.
-
अनिताने २००३ मध्ये 'कुछ तो है' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण बॉलिवूडमध्ये तिला अपेक्षित यश मिळालं नाही.
-
अनिताने हिंदीसोबत तेलुगू, कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”