बॉलिवूडची ‘बेबी डॉल’, अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी २०१७ मध्ये एका मुलीला दत्तक घेऊन तिचं पालकत्त्व स्वीकारलं. सनीने निशा कौर वेबर असं त्या मुलीला नाव असून १४ ऑक्टोबर रोजी तिच्या वाढदिवशी सनीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली. निशा आता पाच वर्षांची झाली असून ती दोन वर्षांची असताना सनीने दत्तक घेतलं होतं. निशाचा फोटो पोस्ट करत सनीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 'स्वीट एंजल निशा कौर वेबर, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू आमच्या आयुष्यातील प्रकाश आहेस. मला विश्वासच बसत नाहीये की तू पाच वर्षांची झाली आहेस. तू खूप प्रेमळ आणि तुझ्या छोट्या भावंडांची काळजी घेणारी आहेस. तू आमच्यासाठी देवाची खूप सुंदर भेट आहेस', अशा शब्दांत सनीने भावना व्यक्त केल्या. बॉलिवूडमध्ये एकीकडे टेस्ट ट्युब बेबी आणि सरोगसीचं प्रस्थ वाढत असताना सनीचा निशाला दत्तक घेण्याचा निर्णय प्रशंसनीय ठरला होता. महाराष्ट्रातील लातूरमधून सनी आणि डॅनिअलने निशाला दत्तक घेतलं होतं. 'निशा, तुझं प्रेम कोणत्याही क्रूर व्यक्तीचा स्वभाव बदलण्यास भाग पाडेल. तुझ्या वाढदिवशी मी शपथ घेते की मी माझ्या परीने आपल्या व जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यात तेच प्रेम आणि तिच करुणा निर्माण करण्याचा प्रयत्न करेन', असं सनीने पोस्टच्या अखेरीस लिहिलं. अडॉप्शन एजन्सीने (CARA) दिलेल्या माहितीनुसार, सनी आणि डॅनिअलने निशाला दत्तक घेण्यापूर्वी ११ दाम्पत्यांनी तिला नकार दिला होता. निशाच्या वर्णाचं कारण देत तिला दत्तक घेण्यास हे दाम्पत्य कचरत असल्याचं एजन्सीने सांगितलं. मात्र सनीने तिला दत्तक घेऊन एक नवी ओळख दिली. निशाला दत्तक घेतल्यानंतर सरोगसीच्या माध्यमातून सनीला दोन मुलं झाली. त्यापैकी एकाचं नाव अॅशर आणि दुसऱ्याचं नोआ आहे. पती डॅनिअल आणि तीन मुलं असं सनीचं कुटुंब आहे.

हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या