-
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. कधी आपली वक्तव्यं तर कधी फोटोंमुळे…नुसरत जहाँ नेहमीच चर्चेचच असतात. नुसरत जहाँ अतिशय स्टायलिश असून तितक्याच बिनधास्तही आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
दरम्यान सध्या नुसरत जहाँ आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
नुसरत जहाँ यांचं बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
-
नुसरत जहाँ यांनी हे फोटो आपल्या इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नुसरत जहाँ काळ्या रंगाचं लेदर जॅकेटमध्ये दिसत आहेत. नुसरत यांच्या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळाली आहे.
-
चित्रपटसृष्टी आणि संसदेतील त्यांची साथीदार मिमी चक्रवर्तीनेही नुसरत यांच्या फोटोवर कमेंट करत कौतुक केलं आहे.
-
नुसरत यांचा SOS Kolkata चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मिमी चक्रवर्तीदेखील दिसणार आहे.
-
चित्रपटात यश दासगुप्ता प्रमुख भूमिकेत असून हा एक थ्रिलर चित्रपट आहे. नुसरत जहाँ यांचं हे फोटोशूट याच चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे.
-
याआधी नुसरत जहाँ यांनी दुर्गादेवीच्या गेटअपमध्ये फोटोशूट केलं होतं.
-
त्यांच्या या फोटोवरुन वाद निर्माण झाला होता. काही मुस्लीम संघटनांनी यावर आक्षेप नोंदवला होता.

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल