-
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या मिर्झापूर २ या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, विक्रांत मेसी, श्वेता त्रिपाठी, अली फजल या कलाकारांची चर्चा होताना दिसते. मात्र, सध्या खरी चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री, गायिका अमिका शैल हिची. गायिका व अभिनेत्री असलेली अमिका शैल लवकरच मिर्झापूर २ मध्ये झळकणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या सीरिजमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळणार असून तिने अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत या सीरिजविषयी व तिच्या भूमिकेविषयी अनेक गोष्टीवर चर्चा केली. अमिका या सीरिजमध्ये एका गायिकेची भूमिका साकारत आहे. त्यामुळे मिर्झापूरमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. "या सीरिजमध्ये मी एका गायिकेची भूमिका साकारत आहे. हे खरंच माझ्यासाठी फार आनंदाचं आणि भावूक करणारं आहे. माझं स्वप्न पूर्ण होतंय असंच काहीसं मला वाटत आहे", असं अमिका म्हणाली. पुढे ती म्हणते, "पंकज त्रिपाठी यांचा अभिनय पाहून पाहून मी अभिनय करायला शिकले. कारण कोणताही सीन किंवा अभिनय ते अत्यंत सुंदररित्या करतात. एखादी घटना खरंच वास्तववादी वाटावी इतक्या सहजतेने ते काम करतात". मिर्झापूर व्यतिरिक्त अमिका अक्षय कुमारच्या आगामी लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटातही झळकणार आहे. यापूर्वी तिने छोट्या पडद्यावरील बालवीर रिटर्न्स या मालिकेत वायुपरी ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे अभिनयासोबतच अमिका एक उत्तम गायिकादेखील आहे. तिने वयाच्या ९ व्या वर्षी लिटील चॅम्प्स या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. अमिकाने मॅडम सर, लाल इश्क, अभय, बालवीर रिटर्न्स, उडान अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. बऱ्याच वेळा हॉट फोटोशूटमुळे अमिका चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रीय असलेली अमिका फिटनेस फ्रिक असून ती वर्कआऊट करण्यावर अधिक भर देत असल्याचं पाहायला मिळतं. -
सुट्टीचा आनंद घेताना अमिका
-
फोटोशूटसाठी बिनधास्त पोझ देताना अमिका
-
अमिका शैल

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक