-
गेल्या १२ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कायम चर्चेत असते. मग त्या कलाकारांनी मालिका सोडली तरी त्यांच्या चर्चा कामय असतात. काही कलाकरांचे तर मालिकेने संपूर्ण आयुष्य बदलले आहे. त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या यादीमधील एक म्हणजे सिंपल कौल. आज आपण तिच्या विषयी जाणून घेणार आहोत.
-
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत सिंपल कौलने गुलाबो ही भूमिका साकारली होती.
-
गुलाबो आणि जेठालाल यांच्यामधील संवाद प्रेक्षकांना प्रचंड आवडत होते.
-
२०१२मध्ये मालिकेचे निर्माते आसिद मोदी यांनी सिंपल कौलची गुलाबो या भूमिकेसाठी निवड केली होती.
-
पण एका वर्षातच तिने मालिका सोडली.
-
तिने मालिका सोडण्यामागचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.
-
सिंपलने २००२मध्ये एकता कपूरची मालिका 'कसम से' मधून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
-
तिने शरारत, ये मेरी लाइफ है, बा बहू और बेबी, ऐसा देश है मेरा या मालिकांमध्ये काम केले होते.
-
तसेच तिने जस्सी, जिनी और जुजू, यम हैं हम या मालिकांमध्ये काम केले.
-
तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
-
पण गुलाबो या भूमिकेमुळे ती चर्चेत आली होती.
-
शरारत या मालिकेच्या वेळी सिंपल आणि अभिनेता करवीर वोहरा यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती.
-
त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगल्या होता.
-
करणवीरने बिग बॉसमध्ये एण्ट्री केल्यावर शोचा सूत्रसंचालक सलमान खानने करणवीरला त्याच्या वागणुकीवरुन सुनावले होते.
-
ते पाहून सिंपलने सोशल मीडियाद्वारे सलमान खानवर टीका केली होती.

Operation Sindoor Photos : पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी Air Strike केलेल्या ठिकाणाची स्थिती काय आहे? भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळांचे फोटो पाहा