-
सध्या देशभरात नवरात्रीचा उत्साह सुरु आहे. दसऱ्याचा सणही आता जवळ आला आहे. सणासुदीचे दिवस म्हटले की देशभरातील महिलांचा साडी नेसून नटण्याकडे कल असतो.
-
मराठी अभिनेत्री देखील या काळात विविध रंगातील साड्यांमधले आपले फोटो सोशल मीडियावर टाकत असतात. अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही आपलं खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी फेसबूक अकाऊंट)
-
साडी ही प्रत्येक महिलेचा जीव की प्राण म्हणून ओळखली जाते. नवरात्रीच्या रंगात प्राजक्ताच्या साडीतल्या वेगवेगळ्या अदा आणि सौंदर्य खुलून आलं आहे.
-
तिच्या या खास फोटोशूटला सोशल मीडियावर चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
-
जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता माळीचा चेहरा घराघरात पोहचला. यानंतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटातून काम केलं आहे.
-
लॉकडाउनच्या काळात प्राजक्ताने आपलं यु-ट्यूब चॅनल तयार करुन त्यावर योगविद्येचेही धडे दिले. यासंदर्भातले छोटे-छोटे व्हिडीओ ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत असते.
-
सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात निवेदनाची जबाबदारी सांभाळते आहे.

पितृपक्षात ‘या’ राशींना मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद! अफाट पैसा, धनसंपत्ती अन् मोठं यश, तर ‘या’ राशींच्या नशिबी संकट…