-
छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. खासकरुन बाल कलाकार म्हणून काम करणारा भव्य गांधी. त्याची टप्पू ही भूमिका विशेष गाजली होती.
-
भव्यने तब्बल ८ वर्ष टप्पू हे पात्र साकारल्यानंतर २०१८मध्ये मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
-
भव्यला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली होती.
-
भव्यने आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो पत्रकार असल्याचे सांगितले होते.
-
त्याने गुजराती भाषेमध्ये अनेक लेख लिहिले आहेत.
-
त्याने अनेक गुजराती चित्रपटांमध्येदेखील काम केले.
-
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केल्यानंतर तो गुजराती चित्रपटसृष्टीकडे वळल्याचे पाहायला मिळाले.
-
त्याने 'पप्पा तामणे नाही समजाय' या चित्रपटातून गुजराची फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.
-
त्यानंतर त्याने 'बाव ना विचार' अशा अनेक गुजरारती चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
गुजरातमध्ये भव्यच्या या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला.
-
तारक मेहतानंतर भव्य गांधीने गेल्या वर्षी 'शादी के सियापे'मध्ये काम करत छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.
-
पण या मालिकेला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
-
आता भव्य यूट्यूबवर एक टॉक शो करत आहे.
-
या शोचे नाव 'Manan Ni Therapy'असे आहे.
-
त्याचा हा शो जिओ स्टूडिओच्या यूट्यूब चॅनेलवर सुरु आहे.

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…