-
अनेक अभिनेत्रींचे लव्ह अफेअर- ब्रेकअप, लग्न, घटस्फोट हे होतच असतात.
-
आता एका अभिनेत्रीने वयाच्या ५०व्या वर्षी बॉयफ्रेंडशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
ही अभिनेत्री म्हणजे छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री डेलनाज इराणी.
-
नुकतीच डेलनाजने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीमध्ये तिने ती ५०व्या वाढदिवशी लग्न बंधनात अडकणार असल्याचे तिने म्हटले आहे.
-
गेल्या आठ वर्षांपासून डेलनाज बॉयफ्रेंड पर्सी करकरीयासोबत राहते.
-
त्यांच्या रिलेशनला जवळपास आठ वर्षे झाली आहेत. त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही.
-
डेलनाजच्या ५० व्या वाढदिवशी ती लग्न करणार असल्याची हिंट तिने दिली आहे.
-
'बाहेरचे सोडा, माझ्या घरातील अनेकांना प्रश्न पडला आहे की मी लग्न कधी करणार. मी आणि पर्सी इतर कपल प्रमाणेच एकमेकांसोबत राहतो. आमच्यासाठी लग्न म्हणजे एक कागदाचा तुकडा आहे' असे डेलनाजने म्हटले.
-
पुढे तिने, 'पुढच्या वर्षी जर मी माझा ५०वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला तर लग्न देखील करेन' असे म्हटले आहे.
-
पर्सी आणि डेलनाज यांच्यामध्ये १० वर्षाचा फरक आहे.
-
सध्या डेलनाज 'हायजॅक' या क्राइम थ्रीलर शोमध्ये काम करत आहे.
-
या शो मध्ये ती पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहे.
-
ती शिवानी सिंग या महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
-
दरम्यान तिने लोकप्रिय मालिका 'छोटी सरदारनी'मध्ये देखील भूमिका साकारली आहे.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली