-
करोना विषाणू आणि लॉकडाउनचा मनोरंजनसृष्टीला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. अनेक मोठमोठे निर्माते अद्याप या आर्थिक टंचाईतून बाहेर आलेले नाहीत. परिणामी काही निर्मात्यांनी तर सुरु असलेल्या मालिकाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या फोटो गॅलरीत आपण करोनामुळे बंद होणाऱ्या १० मालिका पाहणार आहोत. ही गॅलरी काळजीपूर्वक पाहा कारण कदाचित तुमची देखील एखादी आवडती मालिका यामध्ये असू शकते.
-
अकबर का बल.. बीरबल – ही मालिका या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु झाली होती. कमी टीआरपी आणि आर्थिक टंचाईमुळे ही मालिका बंद होत आहे.
-
गँग्स ऑफ फिल्मीस्तान – हा एक कॉमेडी शो आहे. काही महिन्यांपूर्वीच हा शो सुरु झाला होता. परंतु आर्थिक बाबींमुळे केवळ ५० एपिसोडनंतरच हा शो बंद केला जात आहे.
-
पवित्र भाग्य – कमी टीआरपी आणि आर्थिक टंचाईमुळे ही मालिका बंद होत आहे.
-
इश्क सुभान अल्लाह – कमी टीआरपी आणि आर्थिक टंचाईमुळे ही मालिका बंद होत आहे.
-
कहत हनुमान जय श्री राम – पौराणिक कथांवर आधारित असलेली ही मालिका गेल्या वर्षी सुरु झाली होती. कमी टीआरपीमुळे ९ ऑक्टोंबरला ही मालिका बंद झाली.
-
कसौटी जिंदगी की २ – ही मालिका दोन वर्षांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात सुरु झाली होती. परंतु अल्पावधीतच या मालिकेचा टीआरपी घसरु लागला. तरी देखील दोन वर्ष ही मालिका सुरु होती. परंतु आर्थिक बाबींमुळे ही मालिका चालवणं आता कठीण होत आहे. परिणामी निर्मात्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला.
-
पवित्र भाग्य – कमी टीआरपी आणि आर्थिक टंचाईमुळे ही मालिका बंद होत आहे.
-
प्यार की लुका छुपी – कमी टिआरपीमुळे ही मालिका बंद करण्यात आली.
-
ये जादू है जिन्न का – ही मालिका गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये सुरु झाली होती. या मालिकेत खुप मोठ्या प्रमाणावर स्पेशल इफेक्टचा वापर केला जातो. आर्थिक टंचाईमुळे निर्मात्यांना हा खर्च करणं आता शक्य राहिलेलं नाही. परिणामी ही मालिका आता बंद केली जात आहे.

१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ