-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सध्या गर्भवती आहे. विराट-अनुष्का आई-बाबा बनणार आहेत, तर विराटची आई सरोज कोहली पुन्हा एकदा आजी बनणार आहे. (सर्व फोटो सौजन्य – विराट-अनुष्का इन्स्टाग्राम)
-
विराट-अनुष्का सुट्टयांमध्ये आईला जरुर भेटायला जातात. अनुष्का शर्माचे आपल्या सासूसोबत कसं नातं आहे, ते जाणून घ्या.
-
विराट कोहलीचे वडिल प्रेम कोहली वकिल होते. २००६ मध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचे निधन झाले.
-
लहानपणापासून विराट कोहली भावनिक दृष्टीने आपल्या आईच्या खूप जवळ आहे.
-
२०१७ मध्ये विराट कोहलीबरोबर लग्न केल्यानंतर अनुष्काचेही आपल्या सासूसोबत चांगले संबंध आहेत. दोघांमध्ये चांगले बाँडिंग आहे.
-
मदर्स डे च्या दिवशी अनुष्का आपल्या आईसोबत सासूचीही आवर्जून आठवण ठेवते. या वर्षी मदर्स डे च्या दिवशी अनुष्काने आपल्या आईचा आणि सासूचा फोटो पोस्ट केला होता. 'तुमच्या प्रेमाने आम्हाला नेहमीच योग्य मार्ग दाखवला आहे, हॅप्पी मदर्स डे' असा संदेश तिने लिहिला होता.
-
विराट कोहली आता अनुष्कासोबत मुंबईत स्थायिक झाला आहे. पण आईला भेटायला तो दिल्लीला जरुर येतो. त्यावेळी अनुष्काही त्याच्यासोबत असते.
-
विराट कोहली सध्या दुबईत आयपीएल स्पर्धा खेळतोय. यावेळी अनुष्का प्रेक्षक गॅलरीतून विराटचा उत्साह वाढवताना दिसते.
-
विराट कोहली मैदानावर खेळत असला तरी तिथूनही तो गर्भवती असलेल्या पत्नीची तितकीच काळजी घेताना दिसतो.
-
विराट-अनुष्का हे जोडपे सोशल मीडियावर सक्रिय आहे. या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांना नेहमी अपडेट देत असतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…