-
२ नोव्हेंबर रोजी बॉलिवूडचा किंग खान, शाहरूखचा ५५ वा वाढदिवस होता. अनेकांनी त्याला आपापल्यापरीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नावाप्रमाणेच म्हणजेच त्याची लाईफस्टाईलही किंग सारखीच आहे. जाणून घेऊया ताच्या ताफ्यात कोणत्या कार्स आहेत.
-
Bugatti Veyron: बुगाती जगातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक मानली जाते. या गाडीची किंमत जवळपास १२ कोटी इतकी आहे. केवळ २.४ सेकंदात ही कार १०० किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते. (फोटो – विकीपीडिया)
-
Bentley Continental GT: शाहरूखच्या कार्सच्या ताफ्यात Bentley Continental GT ही कारदेखील असून हीदेखील अतिशय महागडी कार आहे.
-
Rolls Royce Phantom Drophead Coupe: शाहरूखच्या ताफ्यात रोल्स रॉईसदेखील असून या गाडीची किंमत तब्बल ७ कोटी रूपये इतकी आहे.
-
BMW 7-series: शाहरूखकडे BMW 7-series ची कारदेखील आहे. BMW 7-series ही जगातील सर्वाधिक फीचर असलेल्या कार्सपैकी एक आहे.
-
BMW i8: भारतात खरेदी करण्यात येणाऱ्या मोस्ट स्टनिंग हायब्रिड कारपैकी BMW i8 ही कार आहे.
-
2020 Hyundai Creta: शाहरुख च्या कार कलेक्शनमध्ये 2020 Hyundai Creta देखील आहे. मार्च २०२० मध्ये ही कार लाँच करण्यात आली होती. शाहरूखनं सर्वप्रथम ही कार घेतली होती.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग