सोशल मीडियावर कधी कोणाचा फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. यात अनेकदा सेलिब्रिटींची मुलं किंवा त्यांचे नातेवाईक हे प्रसारमाध्यम आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या अशीच एक चर्चा रंगली आहे ती आलिया छिब्बा या तरुणीची. (सौजन्य : आलिया छिब्बा इन्स्टाग्राम) अलिकडेच अभिनेता शाहरुख खानने त्याचा ५५ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. यात त्याचा बुर्ज खलिफा येथील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे या फोटोमध्ये शाहरुखपेक्षा त्याच्यासोबत असलेल्या आलियाची सर्वाधिक चर्चा रंगली. शाहरुखसोबत आलियाच फोटो पाहिल्यानंतर ही तरुणी नेमकी कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला. आलिया छिब्बा ही शाहरुखच्या कुटुंबातील एक सदस्य असून ती गौरी खानच्या भावाची म्हणजेच विक्रांत छिब्बा यांची मुलगी आहे. शाहरुखची लेक सुहाना अनेकदा सोशल मीडियावर आलियासोबतचे फोटो शेअर करत असते. आलियाचा कलाविश्वाशी फारसा संबंध नसला तरी ती सोशल मीडियावर कायमच चर्चेत ठरत असते. आलिया अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे हटके आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आलियाला कलाविश्वापेक्षा फॅशन इंडस्ट्रीमध्ये रस असून तिला स्वत:चा ब्रॅण्ड सुरु करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं जातं. सुहानासोबत आलियाने शेअर केलेला खास फोटो आलिया तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असल्याचं दिसून येतं. (सौजन्य : आलिया छिब्बा इन्स्टाग्राम) (सौजन्य : आलिया छिब्बा इन्स्टाग्राम) (सौजन्य : आलिया छिब्बा इन्स्टाग्राम)

Manikrao Kokate: रमी खेळतानाच्या व्हिडिओवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी तर…”