'उतरन' या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. ( सौजन्य : रश्मी देसाई इन्स्टाग्राम) कमी कालावधीत रश्मी लोकप्रिय झाली असून आजती चाहत्यांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर रश्मीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे तिच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रश्मी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. सध्या रश्मी तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. रश्मीने आतापर्यंत तिचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र, यावेळी केलेल्या फोटोशूटची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. रश्मीने अलिकडे एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. फोटोसाठी रश्मीने दिलेले पोझ आणि मनमोहक अदा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. कधी पारंपरिक तर कधी बोल्ड अशा वेगवेगळ्या अंदाजात रश्मीने केलेलं फोटोशूट अनेकदा चर्चेचा विषय ठरतं. रश्मी देसाई हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नाव आहे. 'उतरन', 'बिग बॉस' या कार्यक्रमांमुळे ती विशेष चर्चिली गेली. प्रोफेशनल लाइफसोबतच रश्मीची पर्सनल लाइफदेखील चर्चेचा विषय ठरली होती. रश्मीने अभिनेता नंदिश संधूसोबत लग्न केलं होतं. मात्र, काही कारणास्तव हे दोघं विभक्त झाले. एका मुलाखतीत रश्मीने नंदिशपासून विभक्त होण्याचं कारणदेखील सांगितलं होतं. -
रश्मीने तिच्या पायावर टॅटू काढला असून अनेकदा या टॅटूची चाहत्यांमध्ये चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.
-

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग